शासन निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला? Gram panchayat fund details in marathi



ई-ग्राम स्वराज

शासन निधी ग्रामपंचायतने कुठे खर्च केला? Where did the Gram Panchayat spend the funds given for the village marathi तुम्ही जर तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतने पूर्ण केलेली विकासकामे, मंजूर किंवा चालू असलेली कामे, शासनाकडून मिळालेला एकूण निधी वितरण कुठे, कसा झाला? इत्यादीबद्दल माहिती मिळवू इच्छीत असाल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी आहे. ग्रामपंचायतीचा कारभार एक स्वतंत्र ग्रामीण स्थानिक शासन शासकीय संस्था पाहते. या संस्थेत राज्यशासनाचा थेट सहभाग नसला तरी तिचा कारभार सुरळीत व्हावा म्हणून पंचायत समिती, जिल्हापरिषद, प्रादेशिक विभाग (Division), राज्यशासन आणि केंद्रशासन अशी अनुक्रमे शासकीय रचना केलेली असते. शासनाच्या सगळ्यात शेवटच्या थराला ग्रामपंचायत किंवा पंचायतराज असे संबोधले जाते. 


प्रशासन रचना

घरपट्टी, पाणीपट्टी, शेतसारा व इतर कर हे ग्रामपंचायतचे उत्पनाचे प्रमुख साधन आहेत. याशिवाय गावाच्या विकासाठी विविध योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीस निधी मिळत असतो आणि तो निधी संबंधित योजनेसाठीच खर्च करायचा असतो. ग्रामपंचायतचा कारभार लोकांपर्यंत पोहचावा आणि तो अधिक सजग होऊन त्यात पारदर्शकता यावी, लोकांना आपले अधिकार आणि हक्क मिळावेत म्हणून माहितीचा अधिकार, आपले सरकार ऑनलाईन पोर्टल, शासनाच्या एकूण विभागांचे अधिकृत संकेतस्थळं इत्यादी सारख्या आधुनिक तंत्रज्ञाच्या अनेक डिजिटल (ऑनलाईन) सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये फक्त एका क्लीकवर तुमच्या स्मार्टफोनच्या सहाय्याने अर्ज, तक्रारी, विनंत्या पाठवू शकता, माहिती मिळवू शकता.  याशिवाय ग्रामपंचायत ते थेट केंद्रशासनापर्यंतच्या आर्थिक उलाढाली पाहू शकता. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला जाऊन कर्तव्यदक्ष आणि जबाबदार नागरिक असल्याचा अधिकार तुम्ही गाजवू शकता.

ग्रामपंचायतीच्या शासन निधीची माहिती कुठे पाहणार?

Gram panchayat fund details in maharashtra शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतचा ऑनलाईन कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायतचे अधिकृत संकेतस्थळं (Websites) आणि मोबाईल अँप्लिकेशन्स तयार केली आहेत. ज्यात शासनाने आणि किंवा संबधीत ग्रामपंचायतीने वेळोवेळी तिच्या कारभाराचा दस्तावेज ई-स्वरूपात त्या संकेतस्थळांवर अद्यतनित (Update) करणं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे तुम्ही आता फक्त एकाच क्लीकवर घरी थांबून, मोबाईलद्वारे ही माहिती पाहू शकता. त्यासाठी, कोण्या अधिकाऱ्याकडे किंवा ग्रामपंचायतमध्ये विनाकारण फेऱ्या मारण्याची गरज नाही. 

ग्रामपंचायतने केलेला आर्थिक कारभार पाहण्यासाठी अनेक ऑनलाईन पद्धती आहेत. जसे की, ग्रामपंचायतची संकेतस्थळं, मोबाईल ऍप्लिकेशन्स इत्यादी. त्यापैकी ई-ग्रामस्वराज (e- Gram Swaraj) या मोबाईल ऍप्लिकेशन बद्दल आपण आज स्वविस्तर माहिती पाहणार आहोत. या अँप्लिकेशन मध्ये गावाच्या विकास कामांची माहिती आणि शासनाकडून मिळाले एकूण निधी आणि तो कोणकोणत्या विकासकामांसाठी वापरण्यात आला आहे ? याची सविस्तर माहिती आपणास मिळते. 

ई-ग्राम स्वराज (e-Gram Swaraj) या मोबाईल  ऍपलिकेशनवर माहिती कशी पहावी? 

१. सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअर मधून 'e-GramSwaraj' हे ऍप डाउनलोड करुन घ्यावं. हे ऍप सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतच उपलब्ध आहे. 

ऍप थेट इथूनही डाऊनलोड करु शकता:- https://play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified 

२. ऍप उघडल्यावर तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून 'Submit' या बटनवर क्लीक करायचं आहे. 

३. सबमिट केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल त्यात सर्वात वरच्या बाजूला तुम्हाला कोणत्या आर्थिक वर्षासाठी महिती हवी आहे ते निवडायचं आहे. 

४. त्यानंतर तुमच्या समोर पुढीलप्रमाणे तीन पर्याय दिसतील.


अ) ER Details - Elected Representative - म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत प्रतिनिधी यांची माहिती असते. जसे की सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांचं नाव, वय, पद इत्यादी. 

ब) Approved Activities - यात तुम्ही निवडलेल्या आर्थिक वर्षासाठी कोणत्या विकासकामांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे याची माहिती मिळते. 

ड) Financial Progress - यात गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते. या पर्यायावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडले. यात निवडलेल्या आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम 'Receipt' या पर्यायासमोर दिलेली असते. आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला ही रक्कम 'Expenditure' या पर्यायासमोर दिलेली असते. त्यामध्येच  'List of schemes' हा पर्याय असतो. यामध्ये ग्रामपंचयातीला जो एकूण निधी मिळाला, त्याची विभागणी केलेली असते. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि आणि त्यापैकी निधी खर्च झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते.

टीप:  हे एप्लिकेशन नुकतंच शासनाकडून लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे सगळ्याच गावांमधील निवडून आलेल्या प्रतिनिधींची नाव 'ER Details' या पर्यायामध्ये तुम्हाला दिसेलचं असं नाही. 

अश्याप्रकारे तुम्हाला पाहिजे असलेले प्रत्येक आर्थिक वर्ष निवडून तुमच्या ग्रामपंचायतने कधी, किती आणि कोणत्या विकासकामांसाठी वापरला आहे. याची सविस्तरपणे माहिती या मोबाईल ऍपने पाहू शकता. हे ऍपलिकेशन नुकतंच म्हणजे २४ एप्रिल, २०२० रोजी पंचायतराज दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांसाठी सुरू केले. 

मित्रांनो, वरील माहिती पाहण्यात काही अडचण येत असल्यास टिपण्णी करून कळवा. आणि जर दिलेली माहिती आवडल्यास इतरांसोबत नक्की शेअर करा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

  ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो?

•  ग्रामपंचायत कर (tax) कसा आकारते? | ग्रामपंचायत कर व फी नियम

•  स्वतंत्र अथवा नविन ग्रामपंचायत स्थापना/विभाजनासाठी निकष व अटी

•  गावचा सरपंच कसा असावा? | असा असावा आदर्श सरपंच

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. कहाकर बु ता. सेनगांव जिल्हा हिंगोली यथील रहिवासी आहे. जे कि, ई ग्रामस्वराज हि वेबसाइटवर उदा. कहाकर ग्रामपंचायत ला 80,000,000.लाख निधी मिळाला तो निधी एकुण दहा कामा मध्ये खर्च केला असा दाखवला, परंतु ग्रामसेवक म्हणतो कि, तो अंदाज पत्रक आहे. मग नेमका निधी किती व कसा खर्च झाला हे लोकांना कसे कळावे सत्यप्रतीत

    उत्तर द्याहटवा
  2. सर मी e ग्राम स्वराज्य aap मधून वर्ष निधी माहिती काढली तर ग्रामसेवक अपील अधिकारी बोलतात नाही सर्वच येत नाही ऑनलाईन आम्ही जे मागितल ते अर्धवट असेल अर्ध अल अर्ध आले नाही त्यातील कामे निधी दिसत आहे कोणत्या कामासाठी वापरला कस काय फायनान्स मधून सर्व तरी पण खोटं बोलत आहेत

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.