ग्रामपंचायत उमेदवारांची अंतिम यादी व उमेदवाराचे शपथपत्र


ग्रामपंचायत उमेदवारांची अंतिम यादी


ग्रामपंचायत उमेदवारांची अंतिम यादी व उमेदवाराचे शपथपत्र | How to Check Grampanchayat Election Candidates Final List केंद्र आणि राज्यसनाचा निधी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतला मिळत असतो. केंद्रीय वित्त आयोगाकडून येणारा शंभर टक्के निधी पूर्वी जिल्हा परिषदेला मिळत होता. तोच शंभर टक्के निधी आता थेट ग्रामपंचायतीला मिळत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ८०% रक्कम फक्त एकटया ग्रामपंचायतला मिळत आहे. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजनेचा निधी ग्रामपंचायतला मिळतो. 

ग्रामपंचायत कारभार आणि सरपंच पदाला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जो तो उमेदवार  हे पद मिळवण्यासाठी, आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी त्यांचे राजकीय घोडे पुढे सरसावत असतात. निवडणूक म्हटली की, गटा-तटाचे राजकारण, भाव-भावकितील कुरघोड्या, वाद-विवाद, समज-गैरसमज, बदनामी, अफवा या गोष्टी आल्याच. अश्यात मतदार राजांनी मात्र त्याचं चित्त थाऱ्यावर ठेवून, गाव सरपंचची निवड करताना अधिक सजग असलं पाहिजे. त्यातच काहीजण मात्र घराणेशाही म्हणून, राजकीय वैर किंवा इतरांना कमी लेखण्यासाठी, मौज-मजा करणे या हेतूनेच या रणांगणात उतरतात. अश्यांचा गावाच्या विकासाशी तीळमात्र संबंध नसतो. 



निवडून येणारे उमेदवार सक्षम व गावाच्या विकासाठी ध्यास घेतलेले असावेत. असे योग्य उमेदवार निवडून देणे हे गावातील मतदारांचे कर्तव्य असते. खोटी आश्वासने देऊन, पैसे वाटप करून, दारू-मटणाच्या मेजवान्या देऊन, पैश्यांच्या जोरावर किंवा भ्रष्ट राजकीय पार्श्वभूमी असणारे काही उमेदेवार निवडूनही येतात. त्यात लोकांचे नुकसान होतेच, याशिवाय गावाच्या प्रगतीला खुंट बसतो. त्यामुळे ज्या उमेदवारांना खरोखरच गाव-विकास करण्याची इच्छा असते त्यांच्या हाती निराशा लागते. यामुळे, उमेदवारांचे पूर्वचरित्र, त्याची वैयक्तिक आणि सामाजिक पार्श्वभूमी मतदाराला माहिती असणं गरजेचं असतं. 

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संबंधित गावातील लोकसंख्येप्रमाणे सदस्यांची संख्या ठरवली जाते. त्याप्रमाणे सदस्यांच्या नामनिर्देशनपत्रासह आवश्यक कागदपत्रे आणि शपथपत्र निवडणूक आयोगास दिले जाते. त्यात उमेदवाराचे नाव, वय, कौटुंबिक माहिती, शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी, व्यवसाय-कामधंदा, एकूण मालमत्ता, शासकीय/निमशासकीय थकबाकी, कर्ज इत्यादी माहिती नमूद असते.

या लेखात आपण तुमच्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये एकूण उमेदवारांची अंतिम यादी, त्यांनी दिलेले शपथपत्र आणि उमेदवाराची वैयक्तिक माहिती ऑनलाईन कशी मिळवता येईल हे पाहणार आहोत. यामुळे मतदारांना योग्य निर्णय घेण्यास थोडीफार मदत नक्कीच होईल.


ग्रामपंचायत उमेदवारांची अंतिम यादी ऑनलाईन कशी पहावी?

१. ग्रामपंचायत उमेदवारांची Gram panchayat election candidate list यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगल वर 'Gram panchayat Election'  असे शोधा.

२. त्यानंतर पहिलाच शोध परिणाम 'State Election Commission - महाराष्ट्र शासन' असा येईल त्यावर क्लीक करा. किंवा थेट पुढील लिंकवर क्लीक करून वेबसाईटवर जा.
https://panchayatelection.maharashtra.gov.in/

३. वेबसाईट उघडल्यावर 'Affidavit by the final contesting candidates' हा पर्याय दिसेल त्यावर क्लीक करा.

४. त्यानंतर एक नवीन पेज उघडले त्यात 'Local Body' मध्ये 'Grampanchayat' हा पर्याय निवडा.

५. 'Division' मध्ये तुमचा प्रादेशिक विभाग निवडा (उदा. नागपूर, अमरावती , कोकण विभाग इ.)

६. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा.

७. यानंतर 'Election Programme Name' मध्ये योग्य असलेली निवडणुकीची तारीख आणि वर्ष निवडा.

८. पुढे तुम्हाला तुमच्या गावातील एकूण वॉर्डची संख्या दिसेल, एक वॉर्ड निवडून 'Search' या पर्यायावर क्लीक करा. 


ग्रामपंचायत ऑनलाईन फॉर्म

यानंतर, तुम्हाला निवडलेल्या वॉर्डच्या उमेदवारांची अंतिम यादी पहायला मिळेल. एक-एक करून प्रत्येक वॉर्ड निवडून प्रत्येक उमदेवाराच्या नावासमोरील 'View Affidavit' या पर्यायावर क्लीक करून वरील बाजूस असलेल्या 'Click to Print Affidavit' हा पर्याय निवडून फाईल डाऊनलोड करू शकता किंवा प्रिंट घेऊ शकता. ज्यामध्ये उमेदवाराची एकूण माहिती पहायला मिळेल. 

मित्रहो, वरील माहिती आवडल्यास इतरांसोबत नक्कीच शेअर करा. जेणेकरून ग्रामपंचायत निवडणूकीतील उमदेवराचे पूर्वचरित्र पडताळण्यास मदत होईल. माहिती पाहण्यासंबंधित काही अडचण येत असल्यास संपर्क फॉर्म भरुन 'माझा गाव' ला संपर्क करा किंवा टिप्पणी करून कळवा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या