मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra महिलांचे आरोग्य आणि पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुट्ंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू करण्याचा मानस होता.

माझी लाडकी बहीण योजना । लाडकी बहीण योजना कागदपत्रे । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना online form । माझी लाडकी बहीण योजना online apply । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना online form । mazi ladki bahin yojana maharashtra mazi ladki bahin yojana 2024

त्यानुसार, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यंची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.

माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश:

१. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.

२. महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.

३. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.

४. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.

५. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.

माझी लाडकी बहीण योजना लाभ:


माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत २१ ते ६० वयोगटातील सर्व महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transter) बँक खात्यात दरमहा १,५००/- इतकी रक्कम दिली जाते. ही रक्कम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत केली जाईल.

माझी लाडकी बहीण योजना पात्रता:

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ खालील पात्र असेलेल्या महिला अर्ज करू शकतात.

१. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.

२. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळतो.

५. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या  लाभाथ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

६. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

७. ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

माझी लाडकी बहीण योजना अपात्रता:

खालील महिला माझी लाडकी बहीण योजनांतर्गत अपात्र ठरतील किंवा त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.

१. ज्यांच्या कुट्ंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

२. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता (Income Tax Payer) आहे.

३. ज्यांच्या कुटूंबातील व्यक्ती कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.

४. लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रु.१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.

५. ज्यांच्या कुट्बातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.

६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष/संचालक/ सदस्य आहेत.

७. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.

८. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत अहेत.

माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे:

१. योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन/ऑनलाईन अर्ज.

२. लाभार्थ्यांचे आधार कार्ड

३. पूर्वी आधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक करण्यात आलं होतं. मात्र आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र नसेल आणि त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 कागदपत्रांपैकी कोणतंही ओळखपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येईल.पूर्वी आधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक करण्यात आलं होतं. मात्र आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र नसेल आणि त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 कागदपत्रांपैकी कोणतंही ओळखपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येईल.

४. 2 लाख 50 हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल आणि  लाभार्थी कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता नाही.

५. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

६. पासपोर्ट आकाराचा फोटो.

७. रेशनकार्ड

८.सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी निवड प्रक्रिया:

'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाड़ी सेविका/पर्यवेक्षिका/ मुख्यसेविका/ सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/ वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभाथ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर केला जातो.

सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे लागते. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका /पर्यवेक्षिका/ मुख्यसेविका/ सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ ग्रामसेवक / वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या अर्जाच्या विविध जबाबदाऱ्या निश्चत करण्यात आल्या आहेत.

नियंत्रण अधिकारी:

आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे हे माझी लाडकी बहीण योजनेसाठी 'नियंत्रण अधिकारी' आहेत. तसेच आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई हे 'सहनियंत्रण अधिकारी' आहेत.

माझी लाडकी बहीण अर्ज करण्याची प्रक्रिया:

पात्र महिला अर्जदार माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करावयाचा झाल्यास, योजनेचे अर्ज पोर्टल/ मोबाईल अॅपद्धारे/ सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आह. (माझी लाडकी बहीण ऑफलाईन अर्ज).

१. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी "अर्ज" भरण्याची सुविधा अंगणवाड़ी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/ आदिवासी)/ ग्रामपंचायत/ वार्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.

२. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/ आदिवासी/ सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचारीद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी पोच पावती दिली जाईल.

३. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.

५. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.

अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/अॅपवर जाहीर केली जाईल, त्याची प्रत अंगणवाडी केंद्र/ ग्रामपंचायत/ वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येते

माझी लाडकी बहीण योजना तक्रार:

जाहीर यादीवरील हरकत पोर्टल/ ऍपपद्धारे प्राप्त केल्या जातील, याशिवाय अंगणवाडी सेविका/मुख्यसेविका/ सेतू सुविधा केंद्र यांचेमार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत / तक्रार नोंदवता येईल. लेखी (ऑफलाईन) प्राप्त झालेल्या हरकत / तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील. पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून ५ दिवसांपर्यंत सर्व हरकत / तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.

सदर हरकर्तीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली "तक्रार निवारण समिती" गठीत करण्यात येईल.

पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल.

योजनेची प्रसिध्दी:- सदर योजनेची प्रसिध्दी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद /नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने केली जाते.  तसेच, गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा/ महिला सभामध्ये सदर योजनेबाबत प्रसिध्दी देण्यात येते.

१. अर्ज भरण्याची सुरुवात - १ जुलै, २०२४

२. अर्ज करण्याची शेवटची दिनांक - १५ जुलै, २०२४

३. लाभार्थीला निधी हस्तांतरण - १४ ऑगस्ट,२०२४

प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत दरमहा रु. १५००/- लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज

दिनांक १ जुलै,२०२४ पासून माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करण्याची सुरवात झाली आहे. अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत आहे. पूर्वी ही मुदत १५ जुलै पर्यंतची होती. आता अर्जदार केवळ एका मोबाईल ऍपच्या सहाय्याने घरबसल्याही या योजेनचा अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. (ladki bahini yojana online apply महाराष्ट्र).

१. अर्जदाराच्या नावे बँक खाते असणे आवश्यक आहे.

२. आधारकार्ड सोबत व अर्जदाराच्या बँक खात्यासोबत मोबाईल क्रमांक लिंक केलेला असावा.

३. अर्जदाराचे वय २१ ते ६५ या वयोगटातील असावे.

४. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० एवढे किंवा त्यापेक्षा कमी असावे.

माझी लाडकी बहीण योजना Online Apply (Nari Shakti Doot App)

प्लेस्टोर मधील 'नारीशक्ती दूत' (Narishakti Doot) या मोबाईल ऍपद्वारे माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम प्लेस्टोर मध्ये जाऊन 'Narishakti Doot' हे 'मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र' चे ऍप डाऊनलोड करा.

• ऍप डाऊनलोड करून, लॉगिन करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक टाका.

• मोबाईलवर प्राप्त झालेला चार अंकी ओटीपी टाकून 'Verify' करा.

• त्यानंतर, 'आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लीक करा' यावर क्लीक करून तुमची प्रोफाइल भरा. जसे की,

- पूर्ण नाव

- ईमेल आयडी

- जिल्हा

- तालुका आणि नारीशक्ती प्रकार भरा.

• त्यानंतर, 'प्रोफाईल अपडेट करा' वर क्लीक करा.

• हमीपत्र PDF डाऊनलोड करा. हमीपत्राची प्रिंट घेऊन अर्जदाराच्या नावाने भरून शेवटी अपलोड करावे लागते.

• यानंतर, ऍपच्या डाव्या बाजूला 'नारीशक्ती दूत' या पर्यायावर क्लिक करा.

• मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लीक करा.

• 'Allow Narishakti Doot to access this device's location?' हा मेसेज येईल. त्यामध्ये, 'While Using The App' हा ऑपशन निवडा.

• यानंतर, फॉर्ममधील सर्व माहिती भरा.

• शेवटी, आवश्यक कागदपत्रे आणि हमीपत्र अपलोड करा.

• मोबाईलमधून सेल्फी फोटो घ्या.

• भरलेली माहिती बरोबर आहे की नाही ते तपासा.

• फॉर्म सबमिट करा आणि मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी टाका.

फ्रॉर्मचा सर्व्ह क्रमांक जतन करून ठेवा. याप्रकारे, तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे.

माझी लाडकी बहीण अर्ज आणि हमीपत्र PDF - डाऊनलोड करा

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

सुकन्या समृद्धी योजना

लेक लाडकी योजना महाराष्ट्र

अल्पभूधारक शेतकरी योजना

डॉ अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसहाय्य योजना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या