ग्रामपंचायत मतदार यादी 2024 Grampanchayat Election Maharashtra

मतदार यादीत नाव शोधणे | मतदार यादी महाराष्ट्र 2024 | मतदान यादी | ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी | ग्रामपंचायत निवडणूक | How to find name in voter list in Maharashtra | Check your name in voter list | How to download voter id card online in Maharashtra | Loksabha election 2024 | Grampanchayat election Maharashtra

मतदार यादीत नाव शोधणे | मतदार यादी महाराष्ट्र 2024 | मतदान यादी | ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी | ग्रामपंचायत निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिनांक १६ मार्च,२०२४ रोजी लोकसभा निवडणुकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात पहिल्या पाच टप्प्यात मतदान पार पडेल. म्हणजेच, महाराष्ट्र राज्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी मतदान प्रक्रिया पडणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक किंवा लोकसभा निवडणूक असो, तुम्हाला तुमच्या गावातील मतदार यादी तुम्ही ऑनलाईन पाहू शकता.  संपूर्ण गावाची मतदान यादी PDF स्वरूपात कशी काढायची हे या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत. (How to find name in voter list in Maharashtra).

मतदार यादीत नाव शोधणे

मतदान यादीमधें नाव आहे किंवा नाही, किंवा वैयक्तिक मतदाराची माहिती खालील पद्धतीने पाहता येऊ शकते.

त्यासाठी तुम्हाला, https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवर भेट देऊन, 'Search in Electoral Roll' हा पर्याय निवडा.

त्यानंतर तुम्हाला 'Search in Electoral Roll' हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर तुमच्या समोर तुम्ही तीन पद्धतीने मतदार यादी पाहण्याचे पर्याय दिसतील.

१) Search by EPIC (वोटर कार्ड क्र.) द्वारे नाव तपासणे.

२) Search by Details वैयक्तिक माहितीच्या आधारे नाव तपासणे.

३) Search by Mobile मोबाईल क्रमांक टाकून नाव तपासणे.

• तुमच्या ग्रामपंचायतची किंवा वार्डची संपूर्ण यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13&fbclid=IwAR1WuIIZpPa124TlTRCvtfay65lFAyVLm2SPusGLMDeu8sJi8v36aAqtR04

• त्यानंतर, राज्य, तुमचा जिल्हा District, लोकसभा मतदारसंघ Assembly Constituency , भाषा Select Language आणि Captcha  टाकून search करा. आणि तुमच्या गावाचे नाव पाहून final roll मध्ये pdf डाउनलोड करा. (Check your name in voter list).

मोबाईल ऍप द्वारे वार्ड/गावानुसार मतदान यादी पहा.

मोबाईल ऍपद्वारे मतदान यादी किंवा मतदान यादीत नाव शोधण्यासाठी, 

• सर्वप्रथम प्ले स्टोर मधून 'True Voter' हे ऍप डाऊनलोड करा. हे ऍप State Election Commision of Maharashtra यांच्यातर्फे बनविण्यात आले आहे.

• 'True Voter' हे ऍप उघडल्यानंतर तुम्ही उजव्या बाजूला तीन डॉट वर क्लिक करून तुमची भाषा निवडू शकता.

• त्यानंतर तुम्हाला ऍपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्याशिवाय मतदान यादी पाहता येऊ शकत नाही.

• यानंतर, नोंदणी करण्यासाठी 'नोंदणी करा' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर,  'A Voter' या पर्यायावर क्लिक करून दिलेली माहिती भरा. जसे की नाव, आडनाव, मोबाईल नंबर इत्यादी माहिती टाकून नोंदणी करा.

• मोबाईल वर आलेला ओटीपी टाकून, मोबाईल नंबर व्हेरिफाय करा.

• ओटीपी व्हेरिफाय झाल्यावर, तुमची 'A Voter' ऍपवर यशश्वीरित्या नोंदणी झाली आहे.

• त्यानंतर, मतदान यादीत नाव शोधा आणि मतदान यादी व इतर पर्याय दिसतील. त्यापैकी तुम्हाला हव्या असेलेल्या पर्यायाची निवड करा.

• वॉर्डप्रमाणे मतदान यादी पाहण्यासाठी, मतदान यादी या दुसरा पर्यायावर क्लिक करा.

• यानंतर, जिल्हा District, लोकसभा मतदारसंघ Assembly Constituency, तालुका, गाव, ग्रामपंचायत, वॉर्ड इत्यादी विचारलेली माहिती भरा.

याप्रमाणे, तुम्ही 'True Voter' हे ऍप द्वारे मतदान यादी पाहू शकता. (Check your name in voter list).

महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणूक 2024 कधी आहे?

महाराष्ट्रात राज्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या पाच टप्प्यांत लोकसभा निवडणूक 2024 होणार आहेत.

मतदान टप्पे खालीलप्रमाणे:

पहिला टप्पा (१९ एप्रिल,२०२४)

१. भंडारा-गोंदिया

२. गडचिरोली-चिमूर (ST)

३. चंद्रपूर

४. रामटेक (SC)

५. नागपूर

दुसरा टप्पा  (२६ एप्रिल,२०२४)

१. वर्धा

२. यवतमाळ-वाशीम

३. हिंगोली

४. नांदेड

५. परभणी

६. बुलढाणा

७. अकोला

८. अमरावती

तिसरा टप्पा  (७ मे, २०२४)

१. सोलापूर (SC)

२. मळा

३. सांगली

४. सातारा

५. रत्नागिरी-सिंधुदुर्ग

६. कोल्हापूर

७. हातकणंगले

८. रायगड

९. बारामती

१०. उस्मानाबाद

११. लातूर (SC)

चौथा टप्पा (१३ मे, २०२४)

१. मावळ

२. पुणे

३. शिरूर

४. अहमदनगर

५. शिर्डी (SC)

६. बीड

७. नंदुरबार (ST)

८. जळगाव

९. रावेर

१०. जालना

११. औरंगाबाद

पाचवा टप्पा (२० मे, २०२४)

१. मुंबई उत्तर

२. मुंबई उत्तर-पश्चिम

३. मुंबई उत्तर-पूर्व

४. मुंबई उत्तर-मध्य

५. मुंबई उत्तर-मध्य

६. मुंबई दक्षिण-मध्य

७. मुंबई दक्षिण

८. धुळे

९. दिंडोरी (ST)

१०.नाशिक

११. पालघर (ST)

१२. भिवंडी

१३. कल्याण

१४. ठाणे

लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र उमेदवार

दिनांक ७ मे, २०२४ रोजी संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्याकरिता लोकसभा निवडणूक मतदान होणार आहे. देशामध्ये एकूण ९४ मतदारसंघामध्ये या दिवशी  मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रामधील एकूण ११ मतदारसंघांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या मतदारसंघांत मतदान होणार आहे, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील मतदारसंघांचा समावेश आहे. जाणून घेऊयात मतदारसंघात कोणकोण उमेदवार आहेत.

सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर रायगड, बारामती, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, व हातकणंगले या ११ मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहेत. या ११ मतदारसंघात कोणकोणते महत्त्वाचे उमेदवार आहेत हे जाणून घेऊयात.

१. रायगड

- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - सुनील तटकरे

- शिवसेना (ठाकरे गट) - अनंत गीते

- वंचित - कुमुदिनी चव्हाण

२. बारामती 

- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित) - सुनेत्रा पवार

- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) - सुप्रिया सुळे

३. धाराशिव

- भाजपा - अर्चना पाटील

- शिवसेना (ठाकरे गट) - ओमराजे निंबाळकर 

- वंचित - भाऊसाहेब आंधळकर

४. लातूर

- भाजपा - सुधाकर श्रृंगारे

- काँग्रेस - शिवाजीराव कलगे

- वंचित - नरसिंहराव उदगीरकर 

५. सोलापूर

- भाजपा - राम सातपुते

- काँग्रेस - प्रणिती शिंदे

६. माढा

- भाजपा  - रणजितसिंह नाईक निंबाळकर 

- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) - धैर्यशील मोहिते पाटील

- वंचित आघाडी - रमेश बारसकर

७. सांगली

- भाजपा - संजय काका पाटील (विद्यमान)

- शिवसेना (ठाकरे गट) - चंद्रहार पाटील

- अपक्ष - विशाल पाटील (वंचित पाठिंबा)

- ओबीसी स्वतंत्र पक्ष - प्रकाश शेंडगे

८. सातारा

- भाजपा - उदयनराजे भोसले

- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - शशिकांत शिंदे

- वंचित आघाडी - प्रशांत कदम

- अपक्ष - अभिजीत बिचुकले

९. रत्नागिरी सिंधुदुर्ग 

- भाजपा - नारायण राणे

- शिवसेना (ठाकरे गट) - विनायक राऊत

- वंचित आघाडी - मारोती काका जोशी

१०. कोल्हापूर 

- शिवसेना (शिंदे गट ) - संजय मंडलिक (विद्यमान)

- काँग्रेस - शाहू महाराज छत्रपती

११. हातकणंगले

- शिवसेना (शिंदे गट) - धैर्यशील माने 

- शिवसेना (ठाकरे गट) - सत्यजित पाटील 

- स्वाभिमानी - राजू शेट्टी 

- वंचित आघाडी - दादासाहेब चवगौंडा पाटील

मतदान कार्ड डाऊनलोड करा online voting card download maharashtra

तुमचे Digital मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या वेबसाईट वर जाऊन E-EPIC DOWNLOAD या पर्यायावर क्लिक करावयाचे आहे. थेट लिंकवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.  https://voters.eci.gov.in/login

• लिंकवर गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला मोबाइल क्रमांक टाकून वेबसाईटवर नोंदणी करायची आहे.

• त्यानंतर तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक टाकायचा आहे. (EPIC क्रमांक हा मतदान कार्डवर आणि तुम्ही मतदान कार्डसाठी भरलेल्या अर्जाच्या पावतीवर पहायला मिळतो).

• EPIC क्रमांक टाकल्यानंतर तुमचे राज्य निवडा.

• Send OTP हा पर्याय निवडून तुमच्या मोबाईल वर ओटीपी मिळवा आणि ओटीपी व्हेरिफाय करा.

• त्यानंतर कॅप्टचा टाकून, Download EPIC या बटनावर क्लिक करा.

अश्या प्रकारे ऑनलाईन Voter Id डाऊनलोड होईल.

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम

ग्रामपंचायत अर्ज नमुने

ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी कामे

ग्रामपंचायत घराचा उतारा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या