नॉन क्रीमीलेअर सर्टिफिकेट मराठी Non Creamy Layer Certificate in Marathi

Non Creamy Layer Certificate Online Maharashtra । नॉन क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादा । Non Criminal Certificate Meaning in Marathi । नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट मराठी कागदपत्रे । नॉन क्रिमीलेअर म्हणजे काय । नॉन क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादा । नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय? । नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट कसे काढावे । Non Creamy Layer Certificate Maharashtra Documents.

Non Criminal Certificate Meaning in Marathi नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढत आहात? तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्गातील व्यक्ती आरक्षणाचा फायदा इच्छित असेल तर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.

नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय? non creamy layer certificate online maharashtra । नॉन क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादा । non criminal certificate meaning in marathi । नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट मराठी कागदपत्रे । नॉन क्रिमीलेअर म्हणजे काय । नॉन क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादा । नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट कसे काढावे । non creamy layer certificate maharashtra documents

क्रिमीलेअर आणि नॉन क्रिमीलेअर म्हणजे काय?

इतर मागास प्रवर्ग (OBC व शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ESBC) यांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेटची आवश्यकता असते. (Non Criminal Certificate Meaning in Marathi).

क्रिमीलेअर म्हणजे काय?


क्रिमीलेअर ही संकल्पना इतर मागास वर्गातील तसेच, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ESBC) यासाठी वापरली जाते. जे लोकं 'क्रिमी लेअर' या संकल्पनेत येतात त्यांना शासकीय व इतर मागास वर्गीय आरक्षणाचा लाभ घेता येत नाही.

ज्यांचे पालक केंद्र व राज्य सरकार मधील वरिष्ठ श्रेणी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, लष्करी व निम लष्करी दलातील कर्नल पेक्षा उच्च पदावरील व्यक्ती आहेत अशा मुलांना सर्वोच न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणाचे फायदे घेता येत नाही.

क्रिमी लेयर साठी उत्पन्नाची मर्यादा ६ लाख एवढी होती. ती आता वाढवून ८ लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. ज्यांचे उत्पन्न ८ लाखा पेक्षा जास्त आहे असे लोकं क्रिमी लेयर या प्रवर्गात मोडतात. आणि ज्यांचे उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असलेले लोकं नॉन क्रिमी लेयर या प्रवर्गात मोडतात. अर्थातच केवळ नॉन क्रिमी लेयर घटकांनाच आरक्षणाचा लाभ मिळवता येतो. (नॉन क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादा).

नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट म्हणजे काय?

नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट म्हणजे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र होय. समाजातील आर्थिक  दृष्ट्या मागास व गरीब लोकांना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट (प्रमाणपत्र) दिले जाते. (Non Creamy Layer Certificate in Marathi).

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र हे मागील तीन वर्षांच्या काळातील आर्थिक उत्पन्नावर आधारित दिले जाते. अर्जदाराच्या पालकांचे मागील तीन वर्षातील प्रत्येक वर्षाचे उत्पन्न हे आठ लाखाच्या आत असणे आवश्यक असते. (नॉन क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादा).

नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटचा उपयोग काय?

1) शासकीय, निमशासकीय, शासन अनुदानित संस्थेत सेवेतील रिक्त जागेसाठी मागासर्वगीय उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते.

2) मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेत असताना सामाजिक आरक्षणाचा व शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी नॉन नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा उपयोग होतो.

नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट लागणारी कागदपत्रे

Non Creamy Layer Certificate Documents Maharashtra in Marathi

1) ओळखीचा व पत्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक.

2) स्थानिक रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड

3) शैक्षणिक व जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड सर्टिफिकेट

4) कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला

5) तहसीलदार यांनी दिलेला मागील 3 वर्षाचा उत्पन्न दाखला.

6) पासपोर्ट साईझ फोटो.

(नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट मराठी कागदपत्रे).

नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट कोण देतं?

उपजिल्हाधिकारी हे नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र योग्य ते कागदपत्रे सादर केल्यानंतर आपल्याला देतात.

नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट कोठून काढता येतं?

शासनामान्य सर्व आपले सरकार सेवा केंद्रात आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट मिळू शकते.

नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट ऑनलाईन काढता येतं का?

होय. नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट काढण्यासाठी आपण सीएससी महाऑनलाईन सिटीजन सर्व्हिस या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.

नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट ऑनलाईन कसे काढावे?


तुम्ही जर नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट मिळविण्यासाठी पात्र असाल तर आपले सरकार या पोर्टलवरून पुढील पद्धतीने नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट ऑनलाईन काढू शकता.

1. सर्वप्रथम https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर जिल्हा निवडून लॉगिन करा. जर लॉगिन आयडी नसेल तर,  नवीन यूजर म्हणून नोंदणी करून घ्या.

2. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला 'महसूल विभाग' या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

3. त्यानंतर, नवीन पेज उघडले त्यामध्ये उपविभागमध्ये 'महसूल सेवा' या पर्याय निवडा. त्याखालीच 'नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र' हा पर्याय निवडून 'पुढे जा' हा पर्याय निवडा.

4. नवीन पेजवर, डाव्या बाजूला 'Service List' हा पर्याय निवडा. यामध्ये पुन्हा 'नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र' हा पर्याय निवडा.

5. त्यानंतर,  तुम्हाला आवश्यक कागदपात्रांची यादी दिसले, त्याखाली 'पुढे जा' यावर क्लिक करा.

6. यानंतर, तुम्हाला नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट काढण्यासाठीचा ऑनलाईन अर्ज दिसेल. त्यामध्ये पहिला पर्याय Cast Certificates मध्ये, 'Non Creamy Layer' हा पर्याय निवडून तुमचा वैयक्तिक तपशील भरा. आणि 'Save' या बटणावर क्लिक करून भरलेली माहिती सेव्ह करा.

पुढे यानंतर, तुम्हाला अर्ज क्रमांक दिसेल तो जतन करून ठेवा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर रुपये 33.60/- एवढे ऑनलाईन शुल्क भरा. पैसे भरल्यानंतर त्याची पावती घेऊन तुमच्या उपविभाग अधिकारी यांच्या कार्यालयात भेट द्यायची आहे. 3-4 दिवसातच नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाते. (Non Creamy Layer Certificate Online Maharashtra).

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात.

तलाठी कामे व कर्तव्य

विवाह नोंदणी फॉर्म नमुना अर्ज ग्रामपंचायत

ग्रामपंचायत घराचा उतारा

सुकन्या समृद्धी योजना माहिती मराठी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या