हर घर तिरंगा घोषवाक्य Swatantra Din Ghosh Vakya Marathi

हर घर तिरंगा घोषवाक्य | स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी | 15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी | तिरंगा घोषवाक्य | स्वतंत्र दिन | 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन | Swatantra Din Ghosh Vakya In Marathi | Best Slogans On Independence Day In Marathi | हर घर तिरंगा अभियान मराठी गीत

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे, जगासमोर आपल्या कर्तृत्ववाचे प्रदर्शन करण्याची संधी आहे. पुढील २५ वर्षासाठी म्हणजे देश जेव्हा २०४७ मध्ये स्वातंत्र्याचे शतक साजरे करेल, तेव्हा जगात भारताचे स्थान काय असेल? भारत देश कोणत्या टप्प्यावर असेल? याची नवीन रूपरेषा, विचारसरणी यांचा संकल्प हा अमृत महोत्सव देईल. 

स्वातंत्र्याची मागील ७५ वर्षे आणि स्वतंत्रलढा एक नवी प्रेरणा देईल. कोणताही संकल्प उत्सवाशिवाय यशस्वी होत नाही. जेव्हा संकल्प उत्सवाचे रूप धारण करतो तेव्हा त्यात लाखो, कोट्यवधी लोकांचे संकल्प जोडले जातात. या भावनेने १३७ कोटी देशवासीयांसह भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सुरवात ७५ आठवड्यांपूर्वी म्हणजे १२ मार्च, २०२१ रोजी दांडी यात्रेच्या ९१ व्या वर्धापनदिनापासून सुरू झाला आहे आणि हा देशाचा  लोकोत्सव १५ ऑगस्ट , २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. (Swatantra Din Ghosh Vakya In Marathi).

हर घर तिरंगा घोषवाक्य | स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी | 15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी | तिरंगा घोषवाक्य | स्वतंत्र दिन | 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन | Swatantra Din Ghosh Vakya In Marathi | Best Slogans On Independence Day In Marathi | हर घर तिरंगा अभियान मराठी गीत

संपूर्ण देशभरात या अमृत महोत्सवाचे प्रदर्शन व्हायला सुरवात झाली आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभिनयानाअंतर्गत घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) हा उपक्रम १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने काही ठळक घोषवाक्ये (स्वातंत्र्य दिन घोषवाक्य) पुढीलप्रमाणे: (Best Slogans On Independence Day In Marathi).

स्वातंत्र्य दिन घोषवाक्य मराठी


वाऱ्याची झुळूक आली की माझ्या घरावर तिरंगा फडकतो,

आपण दिलेला मातीचा सुगंध,

पुन्हा हुतात्म्यांच्या स्वप्नांची आठवण करून देतो.


लोकशाहीचा सण साजरा करूया,

घरोघरी तिरंगा फडकवून अमृत महोस्तव साजरा करूया!


चला स्वातंत्र्याचा सण एकत्र साजरा करूया,

घरोघरी तिरंगा फडकावून देशाचा आदर करूया!


देश माझा मी देशाचा,

तिरंगा अमुचा अभिमानाचा.


भारत आमुचा प्राण,

तिरंगा त्याची शान!


उत्सव आहे हा स्वातंत्र्याचा,

आपल्या तिरंग्याच्या सन्मानाचा.


देशभक्तीचा उरी अभिमान दाटला,

क्षितिजावर फडकतो तिरंगा आपुला.


जातीभाव विसरुनिया एक होऊ,

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू.


अनमोल स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव,

तिरंगा फडकवून, साजरा करू उत्सव.

----

हर घर तिरंगा घोषवाक्य


आता फक्त एकच लक्ष,

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त,

घरोघरी तिरंगा लावण्यासाठी होऊ दक्ष!


माझ्या घरी अभिमानाने उभारणार तिरंगा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त,

हर घर तिरंगा, हर घर तिरंगा!


स्वातंत्र्याचा लढा तो महान,

माझा तिरंगा, माझी शान!


एकच नारा एकच ध्यान

प्रत्येक घरात तिरंग्याची शान


सगळे मिळून देशभक्तीची भावना जागृत करूया,

प्रत्येक घरात तिरंगा फडकवूया!


एकच आमचा नारा,

हर घर तिरंगा, हर घर तिरंगा.


घरोघरी तिरंगा फडकतो,

शौर्याची गीत गातो.


अंधार दूर करा प्रकाश आणा,

घरोघरी तिरंगा फडकवा!


सर्व मिळून देशभक्तीची भावना जागृत करूया,

प्रत्येक घरात तिरंगा फडकवूया!


भारत देश माझा महान

तिरंगा आहे त्याची शान!


स्वातंत्र्याचे योद्धे ते महान,

म्हणूनच तिरंगा डोलतो छान!


आपले कर्तव्य, आपला अभिमान,

वाढवू तिरंग्याची शान!


चला भारत गीते गाऊ,

घरोघरी तिरंगा पाहू!


तिरंगा हाती घेऊ चला,

स्वातंत्र्याचे गाणे गाऊ चला.


देशाचे स्वातंत्र्य मानाने मिरवू,

प्रत्येक घरावर तिरंगा फडकवू.


एक दोन तीन चार,

तिरंग्याचा जयजयकार!


केशरी पांढरा अन हिरवा

अभिमान अमुचा तिरंगा सदा.


भारतमातेचे गीत गाऊ

तिरंगा घरोघरी लावू


सारे मिळुनी अभिमानाने मिरवू,

तिरंगा आपला उंच उंच चढवू.


तुझे स्मरण आमुच्या नसानसांत आहे,

हे तिरंगा आम्हाला तुझा खूप अभिमान आहे!

----

हर घर तिरंगा अभियान मराठी गीत


हर घर तिरंगा हर मन तिरंगा

चला उंचवू मिळुन सारे घरोघरी हा तिरंगा

हर घर तिरंगा हर मन तिरंगा


शान तिरंगा प्राण तिरंगा

मनामनामध्ये हा तिरंगा

श्वास तिरंगा ध्यास तिरंगा

कणाकणात हा तिरंगा

हर घर तिरंगा हर मन तिरंगा


प्रीत तिरंगा गीत तिरंगा

सुरासुरात तिरंगा

होश तिरंगा जोश तिरंगा

उरा उरात तिरंगा

हर घर तिरंगा हर मन तिरंगा


धर्म तिरंगा कर्म तिरंगा

चराचरात तिरंगा

सत्य तिरंगा

नित्य तिरंगा

घराघरात तिरंगा

हर घर तिरंगा हर मन तिरंगा


चला उंचवु मिळुन सारे घरोघरी हा तिरंगा

हर घर तिरंगा हर मन तिरंगा

व्हिडिओ स्रोत: युट्युब चॅनेल Shivprasth

----

नव्या दिशा आणि नव्या आशा,

संकल्प करू नव्या ध्येयांचा,

घरोघरी तिरंगा फडकवूनी,

साक्षीदार होऊयात, या अमृत महोत्सवाचा!


जय महाराष्ट्र! जय भारत!!

हे देखील तुम्हाला आवडू शकते

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान माहिती आणि मार्गदशक सूचना

रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा संदेश २०२२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या