स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 Years of Independence day celebration

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव | हर घर तिरंगा अभियान | हर घर तिरंगा अभियान मराठी | 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन | 15 ऑगस्ट 2022 माहिती | आझादी का अमृत महोत्सव   | घरोघरी तिरंगा उपक्रम | हर घर तिरंगा अभियान मराठी निबंध | स्वातंत्र्य दिन 2022 | 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन 2022 माहिती | 75 years of Independence day celebration in marathi  | 15 August 2022 independence day | Har ghar tiranga link

१५ ऑगस्ट, २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या दिलेल्या सूचनांनुसार 'हर घर तिरंगा' किंवा 'घरोघरी तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात यावा असे आवाहन देशातील सर्व नागरिक व रहिवाशी बांधवांना करण्यात आले आहे. (75 years of Independence day celebration in marathi).

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव | हर घर तिरंगा अभियान | हर घर तिरंगा अभियान मराठी | 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन | 15 ऑगस्ट 2022 माहिती | आझादी का अमृत महोत्सव   | घरोघरी तिरंगा उपक्रम | हर घर तिरंगा अभियान मराठी निबंध | स्वातंत्र्य दिन 2022 | 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन 2022 माहिती | 75 years of Independence day celebration in marathi  | 15 August 2022 independence day | Har ghar tiranga link

'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अभियानाअंतर्गत 'हर घर तिरंगा' या उपक्रमाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती, क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य संग्रामातील बलिदान, त्याग भावना, देशभक्ती या सर्व घटनांचे संस्मरण जनमानसात रहावे, तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला एक व्यापक स्वरुप देण्यासाठी अभिमानास्पद बाब म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाने त्यांच्या घरी, दुकान, कार्यालय, आस्थापना तसेच इमारतींवर भारतीय राष्ट्रध्वज दि. १३ ऑगस्ट २०२२ ते दि. १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत फडकविण्यात यावा अशा सूचना केंद्र शासनाकडून देण्यात आल्या. (75 years of independence day celebration in marathi).


महाराष्ट्र शासनाच्या २२ जुलै, २०२२ च्या शासननिर्णयानुसार शासकीय/निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, निवासस्थाने, इ. इमारतींवर 'हर घर तिरंगा' वा उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकविण्यासंदर्भात पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

१) प्रत्येक विभाग/उप विभाग, विद्यापीठ/महाविद्यालय, कार्यालय यांच्या वेबसाईटच्या दर्शनी भागावर 'घरोघरी तिरंगा' ही टॅगलाईन तसेच तिरंग्याचे चित्र प्रदर्शित करण्यात यावे.

२) सर्व शासकीय/निम शासकीय अधिकारी/कर्मचारी/शिक्षक/शिक्षेतर कर्मचारी/विद्यार्थी/पालक यांनी समाज माध्यामांद्रारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप, इ.) तिरंग्याविषयक चित्र, संदेश प्रदर्शित करण्यात यावा.

४) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात यावे. तसेच, या उपक्रमाबाबत पालक व नागरिकांमध्ये प्रचार, प्रसार व जाणीव/जागृती करावी.

५) शासकीय/निम शासकीय इमारतींबरोबरच खाजगी इमारतींवर किंवा राहत्या घरावर तिरंगा फडकविण्यात यावा. जेणेकरुन इतर नागरिकांमध्ये या उपक्रमाची जागृती निर्माण होण्यास मदत होईल.

६) सांस्कृतिक कार्य विभागाने 'हर घर तिरंगा' या उपक्रमाच्या जागृती मोहिमेसाठी जिंगल, गीते, ध्यनीचित्रफित, इ. ची निर्मिती केली आहे. त्याबाबतची माहिती शासनाच्या https://mahaamrut75.org/ आणि  https://amritmahotsav.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर जिंगल्स, गीते, पोस्टर्स, इ.चा वापर शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच सर्वसाधारण नागरिकांनी देखील सदर उपक्रमाच्या प्रचार, प्रसारासाठी करावा. (Har ghar tiranga link).

७) सदर उपक्रमाकरिता राष्ट्रध्वजाची उपलब्धता शासकीय  विभागामार्फत तालुका/गांव पातळीपर्यंत करण्यासंबंधीच्या सूचना शासन स्तरावरुन देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून सुनिश्चित केलेल्या दराने राष्ट्रध्वज सर्वांना खरेदीसाठी उपलब्ध असतील.

८) 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या अभियानअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबतचे फोटो, चित्रफिती सांस्कृतिक कार्य विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात करण्यात आली आहेत.

वरील सर्व उपक्रम राबविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे आवश्यक असून जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक सूचना:

• सर्व ग्रामपंचायती - ग्रामीण प्रसारासाठी महत्वपूर्ण माध्यम संबंधित विभागांच्या स्तरावर आवश्यक असलेल्या ग्राम पंचायतींच्या प्रमुखांबरोबर संपर्क सत्रे / चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात यावे.

• प्रत्येक गावात ध्वज वितरण आणि विक्री केंद्राची निश्चिती करावी.

• शिलाई काम करणाऱ्या गटांद्वारे (बचत गट) ध्वजांची शिलाई / निर्मिती करता येईल. 

• विक्री / वितरण केंद्र म्हणून ग्रामपंचायत कार्यालयांचा उपयोग करुन घ्यावा.

• ग्रामपंचायतींद्वारे ध्वजांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करता येईल. सदर खरेदी स्थानिक घरांच्या संख्येवर आधारीत असावी.

• सर्व शासकीय इमारती / संस्थांवर ध्वजारोहण करावे.

• स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घ्यावे. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - आरोग्य केंद्रे, रुग्णालये मार्गदर्शक सूचना:

• आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे, उपविभागीय रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालये यांचा या उपक्रमात महत्वपूर्ण सहभाग अपेक्षित असावा.

• संदेह वहन साहित्य - प्रसिध्दी पत्रके, फलक, बॅनर्स इ. स्थानिक भाषेत ठळकपणे प्रदर्शित करावेत.

• प्रसुतिगृहातील सहाय्यक परिचारिकांना तिरंग्याची माहिती असलेल्या पुस्तिका (फ्लिप बुक्स) यांचे वाटप करावे.

• लहान मुलांना रंग देण्यासाठी छापील आकृत्या, छापील कागद (कटआउट्स, प्रिंटआउट्स) उपलब्ध करुन द्यावेत.

• रुग्णालयातील प्रतिक्षा कक्षामध्ये डिजिटल पडदे लावावेत, ध्वज आणि कार्यक्रम संबंधित माहिती प्रदर्शित करावी, तिरंगा ध्वजगीत लावावे, आजादी का अमृत महोत्सव इ. बाबतचे चित्रपट दाखवावेत.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - रास्त भाव धान्य दुकाने मार्गदर्शक सूचना:

रास्त भाव दुकानांमध्ये ध्वज वितरण विक्री केंद्र म्हणून काम पाहावे. या दुकानांमध्ये आणि त्याच्या सभोवताली पूर्व ध्वनीमुद्रित संदेश, सांगितिक जाहिराती (जिंगल), राष्ट्रध्वजावरील माहिती माईकवर प्रसारित करावी.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - शाळा आणि महाविद्यालये मार्गदर्शक सूचना: 

• शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामार्फत घरोघरी तिरंगा अभियानाची जाणीव-जागृती करणे. सदर योजनेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी या माध्यमाचा वापर करावा.

• राष्ट्रध्वजाला समर्पित विशेष संमेलने / शिबीरे / चर्चासत्र इ. चे आयोजन करावे. राज्य/जिल्हा/शाळेचा उल्लेख करुन सोशल मीडियावर फोटो शेअर करावेत. सर्व पालकांना सहभागी होण्यासाठी विशेष दैनंदिन सूचना पत्रे, पत्रके वितरीत करावीत.

• 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अभियाना विषयी माहिती देण्यासाठी पालक शिक्षक सभांचे आयोजन करावे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पोलीस मार्गदर्शक सूचना:

• पोलीस महासंचालकांद्वारे हर घर झंडा या कार्यक्रमाबाबत विशेष बैठकांचे आयोजन करावे. 

• विशेष तिरंगा मानवंदना संचलने आयोजित करावीत.

• हर घर झंडा या कार्यक्रमाविषयी प्रचार, प्रसार व जागरुकतेसाठी प्रचार साहित्य, पत्रिका व इतर साहित्य वितरीत करावे. 

• पथनाट्यांद्वारे तिरंग्याची आण-बाण-शान या संकल्पनेचा प्रसार करण्यात यावा. पोलिस स्टेशन परिसरात - फलक, प्रसिध्दीपत्रके, उभे फलक (स्टेॅंडी) लावणे व ध्वजारोहण करणे.

• पोलिस वसाहतींमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री व वितरण केंद्रे निर्माण करण्याची विशेष मोहीम घ्यावी.

• सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वसाहतींमध्ये /घरी ध्वजारोहण करावे.

• प्रत्येक पोलीस तपासणी नाक्‍यावर तिरंगा ध्वजाची प्रसिध्दीपत्रके लावावी.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - परिवहन सुविधा मार्गदर्शक सूचना:

• राज्य परिवहनच्या बसेस 'घरोघरी तिरंगा' याच्या संदेशाने रंगविल्या जाव्यात.

• पथकर व तपासणी नाके यांचे माध्यमातून हर घर झंडा या कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार व जागरुकता निमार्ण करण्यासाठी माहिती पुस्तिका, प्रसिध्दी पत्रके इ. वितरित करणे.

• राज्य आणि जिल्हा स्तरावरील कृती आराखड्याबद्दल प्रसार माध्यमांना विशेष माहिती देणे. याअंतर्गत दररोज विशेष बातमीपत्र सुरु करण्यासाठी दुरदर्शनचा, आकाशवाणीचा वापर करावा.

• ध्वज निर्मिती, वितरण, देशभक्ती यांच्याशी संबंधित असलेल्या स्वारस्यपूर्ण कथा निर्माण कराव्यात. सर्व सार्वजनिक बदलीच्या ठिकाणी भिंतीचित्रे (वॉल पेर्टिंग्ज) निर्माण करावीत.

महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत मार्गदर्शक सूचना:

• सर्व महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत - नागरी भागातील प्रसारासाठी महत्वपूर्ण माध्यम महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत यांच्या प्रशासकीय प्रमुखांनी संबंधित वॉर्डच्या अधिकाऱ्यांसमवेत समन्वय करुन संपर्क सत्रे / चर्चासत्रे याचे आयोजन करावे.

• प्रत्येक वॉर्डात ध्वज वितरण आणि विक्री केंद्राची निश्चिती करावी.

• विक्री / वितरण केंद्र म्हणून महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत कार्यालयांचा उपयोग करुन घ्यावा.

• महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत या आस्थापनांना ध्वजांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करता येईल. सदर खरेदी स्थानिक घरांच्या संख्येवर आधारीत असावी.

• सर्व प्रशासकीय इमारती / संस्थांवर ध्वजारोहण करावे.

• स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घ्यावे.

• संदेश वहन साहित्य - प्रसिध्दी पत्रके, उभे फलक, बॅनर्स इ. स्थानिक भाषेत ठळकपणे प्रदर्शित करावेत.

• महानगर पालिका / नगरपालिकांच्या रुग्णालयातील प्रतिक्षा कक्षांमध्ये डिजिटल पडदे लावावेत, ध्वज आणि कार्यक्रम संबंधित माहिती प्रदर्शित करावी, तिरंगा ध्वजगीत लावावे, आजादी का अमृत महोत्सव इ. बाबतचे चित्रपट दाखवावेत. राष्ट्रध्वजाला समर्पित विडोष संमेलने / शिबीरे / चर्चासत्र इ. चे आयोजन करावे. महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत वसाहतीमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री व वितरण केंद्रे निर्माण करण्याची विशेष मोहीम घ्यावी.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रश्नोउत्तरे:

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कधीपासून साजरा केला जातो?

स्वातंत्र्याचा (आझादीचा) अमृत महोत्सव महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमापासून १२ मार्च, २०२१ पासून ७५ आठवड्यांसाठी सुरू झाला. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अर्थ काय?

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा होणाऱ्या 'आजादी का अमृत महोत्सवात' लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयामार्फत सुरु केलेला आहे. यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मालिका तयार केली आहे. हा अमृत महोत्सव 'जन भागीदारी' आणि 'जनआंदोलन' च्या भावनेने साजरा केला जाईल.

अमृत महोत्सव कधी साजरा केला जातो?

स्वाभिमान आणि स्वातंत्र्यानंतर आता देश सातत्याने स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जात आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू झालेला 'आझादी का अमृत महोत्सव' हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे भारत सरकारने १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. (15 August 2022 Independence day).

जय महाराष्ट्र ! जय भारत !!

हे देखील तुम्हाला आवडू शकते

घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) उपक्रम घोषवाक्ये

रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा संदेश २०२२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या