ग्रामपंचायत वेबसाईट Gram Panchayat Website Maharashtra

पंचायत राज वेबसाइट महाराष्ट्र । ग्राम पंचायत ऑनलाइन महाराष्ट्र । Gram Panchayat Online Maharashtra । ग्रामपंचायत वेबसाईट Gram Panchayat Website Maharashtra । ग्रामपंचायत वेबसाईट Maharashtra । ई ग्रामपंचायत

वाचक मित्रहो,

भारत देश हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. गावखेड्यांचा विकास हा खऱ्या अर्थाने देशाचा विकास असतो. सद्यस्थितीत शहरी भागापेक्षा ग्रामीण भाग जास्त मागासलेला दिसून येतो. शहरी भागातील वाढते औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संधी शहरीभागांकरिता मर्यादित राहतात. याउलट ग्रामीण भागात बेरोजगारी, निरक्षरता, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांसारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावून त्यांच्या मुलाभत गरजांपूर्ण करून, डिजिटलायझेशनाची (Digitization) ओळख व्हावी म्हणून भारत सरकारकडून अनेक योजना, उपक्रम ग्रामीण भागात राबविले जात आहेत.

पंचायत राज वेबसाइट महाराष्ट्र । ग्राम पंचायत ऑनलाइन महाराष्ट्र । Gram Panchayat Online Maharashtra । ग्रामपंचायत वेबसाईट Gram Panchayat Website Maharashtra । ग्रामपंचायत वेबसाईट Maharashtra । ई ग्रामपंचायत

ग्रामीण भागातील जनतेमध्ये तसेच येथील स्थानिक स्वराज संस्था म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायतमध्ये डिजिटल साक्षरतेची जाणीव करून देणे हे देशापुढील आव्हानच होते. भारत सरकारच्या ई पंचायत प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील डिजिटायझेशनला (Digitization) चालना मिळाली. लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी, एरिया प्रोफाईलर, प्लॅन प्लस, प्रिया सॉफ्ट, सोसिअल ऑडिट, ग्रामसेवा केंद्र, नॅशनल पंचायत पोर्टल, जियोग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम आणि ई-निविदा प्रणाली यांसारख्या ऑनलाईन कार्यप्रणालीमुळे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक झाला आहे असे म्हणता येईल. (Gram Panchayat Online Maharashtra).


ई पंचायत प्रकल्पाची उद्दिष्ट्ये:

ई पंचायत प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे देशातील सर्व स्थानिक स्वराज संस्थेचा कारभार ऑनलाईन करून, त्याला पारदर्शकता प्राप्त व्हावी. (ग्राम पंचायत ऑनलाइन).

• ग्रामीण भागात राबविल्या जाणाऱ्या ग्रामविकास योजनांची ऑनलाईन देखरेख करणे.

• नरेगा व घरकुल योजनांची माहिती ऑनलाईन वेबसाईटवर अद्ययावत करणे.

• ग्रामपंचायत अभिलेखांचे डिजिटायझेशन करणे.

• ग्रामीण भागात संगणक साक्षरता वाढविणे.

• ग्रामपंचायतीमध्ये ग्राम सेवा केंद्रांची स्थापना करून, नागरिकांना विविध सुविधा/सेवा उपलब्ध करून देणे.

खालीलप्रमाणे ग्रामपंचायतीच्या काही ठराविक वेबसाईटची (Gram Panchayat Website Maharashtra) यादी दिली आहे. ज्यामध्ये, ग्रामपंचायतीची विविध माहिती प्राप्त करता येऊ शकते.

1. GPDP NIC IN (Gram Panchayat Development Plan) वेबसाईट

2. Asha Sevika Profile Maharashtra वेबसाईट

3. ग्रामपंचायत माहिती (Profile) वेबसाईट

4. ग्रामपंचायतीचे पोर्टल

5. Digitally Signed 7/12 वेबसाईट

6. ग्रामपंचायत मतदार यादी

7. ई ग्राम स्वराज 4 वेबसाईट:

1. GPDP NIC IN (Gram Panchayat Development Plan) वेबसाईट:

ही वेबसाईट भारत सरकारची ग्रामपंचायतीचा विकास आराखडा दर्शविणारी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर ग्रामपंचायत माहिती, ग्रामपंचायतमधील सुविधा देणारे कर्मचारी/कामगार (Facilitators) यांची नावे पहायला मिळतात. उदा. ग्रामपंचायतीमधील पाणी कर्मचारी, रोजगार सेवक, आरोग्य सेवक, अंगणेवाडी सेविका, कृषीसहाय्यक इत्यादी. याशिवाय ग्रामसभेचे फोटो (Gram Sabha Images), ग्रामसेभेतील उपस्थिती, ग्रामसभेतील ठरावाची प्रत (Plan Approved in Gram Sabha), ग्रामपंचायत नियोजित विकास आराखडा (Plan Uploaded in eGramSwaraj) इत्यादी माहिती प्राप्त होते.

माहिती पाहण्यासाठी, खालील वेबसाईटवर भेट देऊन योग्य पर्याय निवड करा आणि राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.


वेबसाईट: gpdp nic in

2. Asha Sevika Profile Maharashtra वेबसाईट:

महाराष्ट्र शासनाच्या या (Asha Sevika Profile Maharashtra) वेबसाईटवर संबंधित ग्रामपंचायतीमध्ये आशा वर्कर (आशा सेविका) म्हणून कोण कार्यरत आहे? याचा पूर्ण तपशील जिल्हा, तालुका, गाव निवडून पाहता येतो. यामध्ये आशा वर्करचे नाव, तीच्या सेवेच्या नेमणुकीची तारीख, शिक्षण आणि आशा सेविकेचा संपर्क क्रमांक इत्यादी तपशील पाहता येतो.

वेबसाईट: health asha maharashtra government in

3. ग्रामपंचायत माहिती (Profile) वेबसाईट:

या ग्रामपंचायत वेबसाईटवर महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामपंचायतीची माहिती पहायला मिळते. जसे की, ग्रामपंचायत कार्यकारणी तपशीलमध्ये सरपंच, उपसरपंच आणि निवडून आलेले सदस्य यांचा मोबाईल क्रमांक, इमेल आयडी, पदप्राप्त दिनांक, पदसमाप्ती दिनांक आणि त्यांचा फोटो इत्यादी तपशील पहायला मिळतो.

याव्यतिरिक्त, तूम्ही निवड केलेल्या ग्रामपंचायतीची क्षेत्रफळ, जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अंतर, वार्ड संख्या, कुटुंब संख्या, एकूण लोकसंख्या, एकूण पुरुष, स्त्री इत्यादी तपशील पाहू शकता.

वेबसाईट: Onegov login

4. ग्रामपंचायतीचे पोर्टल:

वरिलप्रमाणेच ग्रामपंचायतीच्या या वेबसाईटवर ग्रामपंचायतीची खालील माहिती प्राप्त होते.

• गाव पातळीवर राबविल्या जाणा-या विविध योजना

• कमिटी मेम्बर्स (समिति)

• ग्रामपंचायतीने ठरविलेले कर दर (Tax Rate)

• ग्राम वाहतुकीची साधने

• गावातील असणारी पर्यटन क्षेत्र

• माहितीचा अधिकार अधिनियम, 2005

सदर माहिती पाहण्यासाठी, खालील वेबसाईटवर भेट देऊन राज्य, जिल्हा परिषद, ब्लॉक पंचायत (तालुका), गाव निवडून माहिती मिळवता येते.


वेबसाईट: panchayat portal maharashtra

5. Digitally Signed 7/12 वेबसाईट:

सदर वेबसाईटवर ऑनलाईन डिजिटल सातबारा पाहता येतो किंवा काढता येतो. ऑनलाईन ७/१२ काढण्यासाठी वेबसाईटवर जाऊन 'OTP Login' किंवा 'Regular 'Login' या पर्यायांपैकी एक पर्याय निवडून लागून करावे लागते. त्यानंतर जिल्हा, तालुका गाव निवडावे लागेल. ऑनलाईन डिजिटल सातबाराच्या एका पानासाठी तुम्हाला रु. १५/- इतके शुल्क द्यावे लागते.

वेबसाईट: digital satbara mahabhumi government in

अधिक माहितीसाठी इथे वाचा: ऑनलाईन डिजिटल सातबारा उतारा कसा काढायचा?

6. ग्रामपंचायत मतदार यादी:

भारत निर्वाचन आयोगाच्या सदर वेबसाईटवर ग्रामपंचायत हद्दीतील मतदार यादीसह संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जिल्हा, तालुका व गाव निहाय मतदार यादी pdf स्वरूपात पाहता येते. ग्रामपंचायत मतदार यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन जिल्हा, विधानसभा मतदार संघ आणि गावाची निवड करा आणि pdf स्वरूपात असलेली मतदार यादी पहा.

वेबसाईट: ceo maharashtra gov in voter list

7. ई ग्राम स्वराज 4 वेबसाईट:

ई ग्राम स्वराज पोर्टल हे ग्रामपंचायतीचा आर्थिक व्यवहार पाहण्यासाठीची एक महत्वाची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर, ER Details मध्ये ग्रामपंचायतीमधील निवडून आलेले प्रतिनिधी यांची माहिती, Approved Activities या पर्यायामध्ये एखाद्या आर्थिक वर्षामध्ये मंजूर झालेला निधी, Financial Progress या पर्यायामध्ये विकासकामांवर झालेला खर्च आणि इतर विकासकामांचा आर्थिक व्यवहार पहायला मिळतो.

ई ग्राम स्वराजचे मोबाईल ऍप प्ले स्टोर मध्ये देखील उपलब्ध आहे.

वेबसाईट: e gram swaraj

ग्रामपंचायतीच्या विविध सरकारी योजना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हे देखील वाचा: ग्रामपंचायत कायदे आणि नियम

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.