Pandit dindayal yojana 2022 | पंडित दीनदयाल उपाध्याय योजना 2021 | पंडित दीनदयाल उपाध्याय योजना 2022 | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana 2022 | Pandit Dindayal Swayam Yojana Information in Marathi | Pandit Dindayal Yojana 2022 Maharashtra | पंडित दीनदयाल उपाध्याय योजना 2021 Last Date | पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना | दीन दयाल उपाध्याय योजना Apply | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Eligibility | Pandit Dindayal Upadhyay Yojana Application Form | Pandit Dindayal Upadhyay Yojana 2023.
राज्यातील महाविद्यालये, उच्च महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, आय.टी. आय इत्यादी उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यास अनेक संकटाना सामोरे जावे लागते. शैक्षणिक खर्च, भोजन, निवास इत्यादी सारख्या परिस्थितीमुळे कित्येक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहिले असतात. अशा विद्यार्थांना मोफत शैक्षणिक, भोजन आणि निवासी सुविधा पुरविण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यात येतो. (पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना 2023).
हे देखील वाचा - महाराष्ट्र स्वाधार स्कॉलरशीप योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना उद्दिष्ट्य:
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, शासकीय वसतिगृहात प्रवेश क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे नवीन वसतिगृहे मंजूर करण्यासाठी किंवा वसतिगृहांची क्षमता वाढविण्यासाठी सतत लोकप्रतिनधींकडून मागणी होत असते. परंतु, नवीन वसतीगृहे मंजूर करणे, वसतीगृहांची प्रवेश क्षमता वाढवणे, भाड्याच्या इमारती शोधणे, वसतीगृहात कर्मचारी नियुक्ती करणे इत्यादी गोष्टींसाठी होणारा विलंब तसेच शासनाचा भांडवली खर्च टाळण्यासाठी वसतीगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करूनही प्रवेश न मिळणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून, भोजन, निवास, आणि शैक्षणिक खर्चासाठी विद्यार्थांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने 'पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना' राज्यभर सुरु करण्यात आली. ही योजना सन २०१६-१७ या शौक्षणिक वर्षापासून राज्यभरात राबविण्यास सुरवात झाली. (Pandit Dindayal Swayam Yojana 2022).
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता राज्यातील इयत्ता १२ वी नंतरच्या उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे विद्यार्थी ग्रामीण तसेच दुर्गम क्षेत्रातून तालुक्याच्या / जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. मात्र, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना या ठिकाणी निवास, भोजन आणि इतर शैक्षणिक खर्च भागविणे कठीण जाते. या कारणांमुळे, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना, 'पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना' (Pandit dindayal yojana 2022) च्या माध्यमातून उच्च शिक्षणाकरीता भोजन, निवास व शौक्षणिक साहित्यासाठी थेट रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश घेणे किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ घेणे हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्याकडे असतात.(पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना 2023).
हे देखील वाचा - कमवा आणि शिका योजना
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना लाभ:
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे ३ प्रकारे वर्गीकरण केलेल्या शहरांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या किंवा, शासकीय वसतीगृहात प्रवेशीत नसलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ. १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेण्याकरिता वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यात येते. (Pandit Dindayal Swayam Yojana Benifits).
वर्ग १: मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अनुज्ञेय रक्कम अनुज्ञेय रक्कम:
१) भोजन भत्ता ३२,०००
२ निवास भत्ता २०,०००
३) निर्वाह भत्ता ८,०००
प्रती विद्यार्थी एकूण ६०,०००
वर्ग २: इतर महसुली विभागीय मुख्यालय शहरातील व उर्वरित 'क' वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम:
१) भोजन भत्ता २८,०००
२ निवास भत्ता १५,०००
३) निर्वाह भत्ता ८,०००
प्रती विद्यार्थी एकूण ५१,०००
वर्ग ३: इतर जिल्हाचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम:
१) भोजन भत्ता २५,०००
२ निवास भत्ता १२,०००
३) निर्वाह भत्ता ६,०००
प्रती विद्यार्थी एकूण ४३,०००
टीप- वरील रक्कमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रु.५,०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रु.२,०००/ इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येते.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना मुलभूत पात्रता निकष:
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी मुलभूत पात्रता व शैक्षणिक निकष पात्रता खालीलप्रमाणे: Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Eligibility.
१. अर्जदार विद्यार्थी हा तो अनुसूचित आणि आदिवासी जमातीचा असावा. विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
२) लाभार्थी विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे.
३) विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक स्वतःच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न /जोडलेला असावा.
४) विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शौक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे त्या शहरातील त्या विद्याथ्याचे पालक रहिवाशी नसावेत.
५) योजनेचा (पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना) लाभ मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांने संबंधित शहरामध्ये राहणे बंधनकारक आहे. (Pandit Dindayal Yojana 2022 Maharashtra).
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना शैक्षणिक निकष पात्रता:
१) लाभार्थी विद्यार्थी १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
२) केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती करीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशा घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत लाभ घेता येतो. मात्र, दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ देण्यात येत नाही.
३) एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा
इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेता येत नाही. किंवा प्रथम पदवी पूर्ण न करता दुसर्या पदवीसाठी प्रवेश मिळाल्यास सुध्दा लाभ घेता येत नाही.
४) मान्यता प्राप्त संस्था/महाविद्यालयात अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असणे आवश्यक आहे.
५) विद्यार्थ्याची शालेय संस्थेमधील/महाविद्यालयातील उपस्थिती ८० टक्केपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
६) विद्यार्थ्यांची निवड करताना गुणवत्तेनुसार निवड केली जाते.
७) निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी लाभार्थी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत योजनेच्या लाभास पात्र राहील. तसेच, विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. (Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Eligibility).
हे देखील वाचा - बालसंगोपन योजना महाराष्ट्र
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचे इतर निकष पात्रता व अटी:
१) योजनेचा लाभ १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येतो.
२) एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ७ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येतो. ७ वर्षे लाभ
घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यास वसतीगृहात प्रवेश मिळणार नाही.
३) विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास योजनेंतर्गत लाभ देण्यात येत नाही.
४) लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
५) योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या सांकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
६) अर्जदार विद्यार्थी शैक्षणिक काळात नोकरी/ व्यवसाय करत नसावा.
७) आदिम जमातीच्या व अनुसुचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येतो. (Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Eligibility).
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना अनुदान वितरण पद्धत:
१) विद्यार्थांना भोजन व निवास भत्त्याची रक्कम प्रत्येक महिन्याला आगावू दिली जाते.
२) शौक्षणिक साहित्याकरिता विहित केलेळी रक्कम शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला एकदाच देण्यात येते.
३) विद्यार्थ्याची संस्थेमधील किंवा महाविद्यालयातील उपस्थिती ८० टक्केपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
४) सदर योजनेमध्ये विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शौक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
५) योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षण न घेता नोकरी /व्यवसाय करुन या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यावर देखील असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील अशा लाभ धारकास योजनेंतर्गत अदा करण्यात आलेली रक्कम व्याजासह वसुली करण्यात येते.
६) या योजनेचा लाभ घेत असलेला विद्यार्थी अनधिकृतपणे वसतीगृहामध्ये राहत असल्याचे आढळल्यास त्याला सदर योजनेच्या लाभाकरिता वसतीगृह प्रवेशाकरिता अपात्र ठरवून त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. तसेच, फसवणुकीबाबत त्याचे संबंधित शिक्षण संस्थेतील प्रवेश रद्द करण्याबाबतही शिफारस करण्यात येते. Pandit Dindayal Yojana 2022 Maharashtra.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आवश्यक कागदपत्रे:
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. (Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana Documents).
1. जात प्रमाणपत्र Cast Certificate
2. उत्पन्न दाखला Income Certificate
3. आधार कार्ड Aadhar Card
4. बँक पासबुक तपशील Bank Passbook
5. डोमासाईल Domacile
7. बोनाफाईड Bonafide, Admission Receipt
8. 10वी/12वी मार्कशिट 10th/12th Marksheet
10. मोबाईल नंबर,ई-मेल आयडी
11. फोटो
दीन दयाल उपाध्याय योजना Apply:
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील करता येतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी swayam.mahaonline gov.in या संकेतस्थळावर भेट द्या. थेट जाण्यासाठी https://swayam.mahaonline.gov.in/ इथे क्लिक करा.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ऑनलाईन रेजिस्ट्रेशन:
योजनेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये लॉगिन करण्यासाठी सर्वप्रथम रेजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी रेजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती भरा. जसे की, आधार कार्ड क्रमांक, नाव, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख टाकून नवीन पासवर्ड सेट करा.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ऑनलाईन अर्ज:
• रेजिस्ट्रेशन करून तयार केलेला यूजर नेम आणि पासवर्डसहित लॉगिन करा. लॉगिन केल्यावर डाव्या बाजूस 'Application' या पर्याय निवडा. त्यामध्ये वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी आणि स्वयं योजेनचे अशा दोन पर्यायांपैकी 'Save' हा पर्याय निवडा. त्यानंतर विभाग आणि उपविभाग निवडून 'Proceed' करा.
• यानंतर, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ऑनलाईन फॉर्म pandit dindayal upadhyay yojana application form उघडेल त्यामध्ये अर्जदार विद्यार्थाने स्वतःचा तपशील भरायचा आहे. जसे की, नाव, पत्ता, कुटूंबाचा तपशील, वार्षिक उत्पन्न, जात प्रमाणपत्र तपशील, महाविद्यालय/शिक्षणाचा तपशील, बँके खात्याचा तपशील इत्यादी.
• सर्व माहिती भरून झाल्यावर, 'Save' हा पर्याय निवडून, फॉर्म जतन करावा लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर फॉर्म सबमिट करावा लागतो. महाविद्यालय/वसतिगृहांच्या मार्फत हा ऑनलाईन फॉर्म Approve झाला की पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी पात्र अर्जदार पात्र होतो. (दीन दयाल उपाध्याय योजना Online Apply).
पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना अंतिम मुदत वाढ:
पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढ शैक्षणिक वर्ष २०२०-२१ यासाठी २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत करण्यात आलेली होती. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी अद्याप अर्ज करण्याची मुदत प्रसारित करण्यात आली नाही. (पंडित दीनदयाल उपाध्याय योजना 2021 Last Date).
• अधिक माहितीसाठी ईमेल आयडी - tddswayamhostelhelp@gmail.com
• वसतिगृह, पंडित दीनदयाल स्वयं योजना संबंधित चौकशीसाठी संपर्क क्रमांक- 0253-2992946.
या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात
• अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.