Swadhar Yojana 2021-22 Last Date । Swadhar yojana 2020-21 pdf । Swadhar Yojana online form । Swadhar Scholarship 2022 last date । Swadhar scholarship । स्वाधार योजना माहिती मराठी
राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याची वाढत असलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्याना शासकीय वसतिगृह सुविधेचा लाभ घेणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठया प्रमाणात विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्याना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासास मर्यादा येत आहेत.
शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्याना तात्काळ वसतिगृह सुरु करुन तेथे प्रवेश देण्यासाठी, मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या व शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपेकी अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्याना उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरीता शासनाने दि. ६ जानेवारी, २०१७ च्या शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधर योजना समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन विभागातर्फे राज्यात सुरु करण्यात आली.
स्वाधार योजना 2021-22 ठळक वैशिष्ट्ये:
• शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणे किंवा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणे हे पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतील.
• शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भोजन, भोजन, निवास, शैक्षणिक साहीत्य, निर्वाह भत्ता, व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आर्थिक सहाय्य त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते.
• केवळ अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरांवरील महाविद्यालयांत/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याना आर्थिक सहाय्य दिले जाते.
• विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येते.
• स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग (अनु.जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यांना ३ टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनु.जाती व नवबौध्द घटकातील) विदयार्थ्यासाठी गुणवत्तेची टक्केवारी ४० टक्के इतकी राहील. व त्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
स्वाधार योजना 2021-2022 निकष आणि पात्रता:
१. विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा.
२. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
३. शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा.
४. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा.
५. विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
६. स्वाधार योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलल्या व प्रवेश न मिळालेल्या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल.
७. विद्यार्थ्यांने स्वत: चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत / शेडयुल्ड बॅकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
८. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे तसेच, केंद्र शासनामार्फत ज्या-ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची उत्पन्न वार्षिक मर्यादा त्या-त्या प्रमाणे लागू राहील.
९. विद्यार्थी स्थानिक नसावा म्हणजेच, ज्या महाविद्यालय/शैक्षणिक सस्थेत विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविद्यालय/शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालीका/ नगर पालीका/ग्रामपंचायत/ कटक मंडळे यांच्या हद्दीत आहेत त्या महानगर पालीका/ नगर पालीका/ग्रामपंचायत/ कटक मंडळे येथील रहीवासी नसावा.
१०. महानगर पालिकेच्या हद्दीपासुन ०५ की.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात/शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थीदेखील या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
११. विद्यार्थी इयत्ता ११ वी,१२ वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
१२. ११ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांस १० वी मध्ये किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
१३. १२ वी मध्ये विद्यार्थ्यास किमान ५० टक्के गुण असल्यावर या योजनेचा पुढे पदवी/ पदव्युत्तर शिक्षणाकरीता लाभ घेता येईल.
१४. पदवी, पदवीका, दोन वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अम्यासक्रमास सदर विद्यार्थ्यांस पुढे लाभ घेण्याकरीता किमान ५० टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन/CGPA असणे आवश्यक राहिल.
१५. १२ वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा. तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी / पदवीका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा. (संबंधित अभ्याक्रम शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळण्यासाठी अनुज्ञेय असावा).
स्वाधार योजना 2021-22 लाभ/अनुदान:
पात्र असणाऱ्या विद्यार्थांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता, व इतर आवश्यक सुविधा मिळण्यासाठी त्यांच्या बँक खात्यावर खालीलप्रमाणे रक्कम स्वाधार योजना २०२२ योजना लाभ/अनुदान म्हणून थेट जमा करण्यात येते. याबाबत सविस्तर तपशील महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, १३ जून, २०१८ च्या शासन निर्णयामध्ये निर्गमित करण्यात आला आहे.
१. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी एकूण देय रक्कम: रु. ६०,०००/-.
२. इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित 'क' महानगर पालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी एकूण देय रक्कम: ५१,०००/-.
३. इतर जिल्हयाच्या ठिकाणी तसेच महानगर पालिकेच्या हद्दीपासून ५ कि.मी परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी एकूण देय रक्कम: ४३,०००/-.
वरिल रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रु. ५०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थांना प्रतिवर्ष रु.२०००/- इतकी रक्कम शैक्षणीक साहित्यासाठी देण्यात येते.
स्वाधार योजना 2021-22 अनुदान वितरण/वाटप:
• स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिल्हयामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याच्या सहायक आयुक्त, समाजकल्याण यांचेकडे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा लागतो. त्यानुसार त्या जिल्हयाचे सबंधित सहायक आयुक्त हे विदयार्थ्यांची निवड करतात आणि पात्र लाभार्थ्यांस जवळचे मागासवर्गीय मुला मुलींचे वसतीगृहांचे गृहपाल यांचेशी संलग्न (Attach) करतात.
• विद्यार्थ्यांचे प्राप्त झालेले अर्ज, विद्यार्थी ज्या जिल्हयामध्ये शिकत आहे त्या जिल्हयाच्या सहायक आयुक्त, समाजकल्याण यांचेकडे पाठवले जातात व त्यानुसार त्या सहायक आयुक्तांनी संबधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा करतात.
• शैक्षणीक वर्षामध्ये विद्यार्थ्याने संबधितत शैक्षणीक सस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेअंतर्गत अनुज्ञेय रक्कमेपैकी पहिल्या सहामाहीची रक्कम आगाऊ देण्यात येते.
• स्वाधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजावट करून, उर्वरीत निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, निवास भत्ता, याची रक्कम अदा करण्यात येते.
• विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५ टक्के आवश्यक राहील याबाबत संबंधित संस्थेचे प्रत्येक सहामाहीस उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल.
Swadhar Yojana 2021-22 Last Date:
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन प्रणालीद्वारे घरी राहुन, शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून 24 डिसेंबर,2021 ला अर्ज घेणे सुरु करण्यात आले होते आणि 31 जानेवारी, 2022 (Swadhar Yojana 2021-22 Last Date) पर्यंत अर्जाची मुदतवाढ देण्यात आली होती.
मात्र आता, दिनांक 3 जानेवारी, 2022 च्या परिपत्रकानुसार सन 2020 -21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता सदर योजनेची (Swadhar Yojana Maharashtra) अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी आपले अर्ज 28 फेब्रुवारी, 2022 (Swadhar Yojana 2021-22 Last Date) पर्यंत सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आली.
स्वाधार योजना 2021-22 कागदपत्रे:
स्वाधार योज़नेअंतर्गत लाभ घेण्यासाठी, विहित नमुना अर्जासहित खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. Swadhar Yojana documents List in marathi
१. आधार कार्ड
२. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
३. मार्कशीट १०वी, १२ वी आणि इतर
४. जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
५. आय प्रमाणपत्र (Income Certificate)
६. बोनाफाईड प्रमाणपत्र
७. बँक पासबुक / बँक खात्याचा तपशील.
Swadhar Yojana online Form:
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी, तसेच अर्ज दाखल करण्यासाठी, योजनेच्या संकेतस्थळावरून फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्हयातुन काढलेले आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये समक्ष / टपालाद्वारे कार्यालयाच्या ई-मेल वर दिनांक २२ फेब्रुवारी, 2022 (Swadhar Yojana 2021-22 Last Date) पर्यंत दाखल करावा. अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
Swadhar Yojana 2020-21 Pdf:
• स्वाधार योजना माहिती मराठी Pdf - डाऊनलोड करा.
• स्वाधार योजना फॉर्म PDF - डाऊनलोड करा.
• Swadhar yojana 2021-22 last date pdf - डाऊनलोड करा.
Swadhar Yojana Official Website:
• स्वाधार योजनेचं अधिकृत संकेतस्थळ (Swadhar yojana official website) https://sjsa.maharashtra.gov.in/ हे आहे.
Swadhar Yojana Helpline Number:
• Mobile Number: 020-26127569
• E-Mail ID: swadhar.sw-----@gmail.com (---- इथे तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका. उदा. swadhar.swyavatmal@gmail.com).
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.