प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना Ujjwala gas yojana in marathi

 

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2021। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मराठी माहिती । उज्जवला योजना महाराष्ट्र । प्रधानमंत्री गॅस योजना यादी । उज्ज्वला योजना फॉर्म PDF ।  PM Ujjwala Yojana 2021 । PM Ujjwala Yojana Online Apply । Ujjwala Yojana 2.0

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे, २०१६ रोजी उत्तर प्रदेशातल्या बलियातून ‘पंतप्रधान उज्ज्वला योजने’ Pradhan Mantri Ujjwala Yojana ची घोषणा केली होती. दिनांक १० ऑगस्ट, २०२१ रोजी पुन्हा पंतप्रधान उज्ज्वला योजना 2.0 (Ujjwala yojana 2.0) म्हणजेच, या योजनेचा दुसरा टप्पा  देशभरात राबविण्यात येईल. अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घोषणा दिली. दारिद्र्यरेषेखालच्या पाच कोटी कुटुंबांना गॅस देणाऱ्या या मुळच्या योजनेचं उद्दीष्ट वाढवून आता आठ कोटी कुटुंबांना गॅस देण्याचा संकल्प केंद्र सरकारनं केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात राखीव निधीची तरतूद केंद्र सरकारनं केली आहे. एकूणच ‘पंतप्रधान उज्ज्वला योजना’ ही गरीब भारतासाठी आरोग्य आणि आर्थिक प्रगतीची दारं उघडणारी जशी ठरते आहे तशीच देशाचं पर्यावरण संवर्धन करणारी देखील Ujjwala Scheme ठरताना दिसते आहे.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2021। ujjwala gas yojana in marathi । उज्जवला योजना महाराष्ट्र । प्रधानमंत्री गॅस योजना यादी । उज्ज्वला योजना फॉर्म PDF ।  pm ujjwala yojana 2021 । pm ujjwala yojana online apply । ujjwala yojana 2.0

दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबांना प्रत्येक कनेक्शनसाठी सोळाशे रुपयांचं अर्थसाहाय्य यातून केलं जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रियादेखील सोपी, सुटसुटीत ठेवण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीनं एलपीजी (LPG) वितरण केंद्रावर गॅस कनेक्शनसाठी अर्ज करायचा. त्यावर आपलं पूर्ण नाव, पत्ता, आधार नंबर, बॅंक खात्याचा नंबर द्यायचा. प्रमाणित केलेलं बीपीएल प्रमाणपत्र, बीपीएल रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत दिला की काम होतं. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गॅस कनेक्शन कुटुंबातल्या महिलेच्याच नावावर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही बाब म्हटलं तर छोटी पण घरातल्या महिलेचा सन्मान वाढवणारी. या योजनेतून लाभार्थ्याला १४.२ किलो वजनाचा सिलेंडर मिळतो. डोंगराळ-दुर्गम भागात हा सिलेंडर वाहतुकीसाठी जड पडत असल्याने पाच किलोचे दोन सिलेंडर देण्याचीही सोय करण्यात आली.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा हेतू/उद्दिष्टे:

पंतप्रधानांनी उज्ज्वला योजना (Pradhan mantri ujjwala yojana)  १ मे, २०१६ रोजी देशात आणली त्यामागे विशिष्ट उद्दिष्ट होतं. महिलांच्या तासांचा हिशेब, स्वच्छ हवा, पर्यावरणाचा मुद्दा या सगळ्यांचा यामागं बारकाईनं विचार केला गेला. पंतप्रधान मोदींनी देशातल्या पाच कोटी कुटुंबांना २०१९ पर्यंत गॅस जोडणी देण्याचं विशाल लक्ष्य निर्धारित केलं होतं आणि कामाला सुरुवात केली. गरिबांच्या कल्याणाचा नेमका सामाजिक विचार या योजनेमागं केलेला आहे, तो असा -

• महिलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्यांचं आरोग्य सुधारणं.

• जैविक इंधनामुळं होणारे आरोग्यसंबंधित गंभीर आजार आणि मृत्यूदर कमी करणं.

• स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या अशुद्ध इंधनामुळं होणारे अपघात मृत्यूकिंवा गंभीर रोगांचे बळी कमी करणं.

• चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिची मुलं अनेकदा तिच्या आसपासच असतात. घरातल्या धुरामुळं होणाऱ्या प्रदूषणातच ती श्वास घेतात. यातून लहान मुलंदेखील श्वसन विकारांना बळी पडतात. यातून त्यांची सुटका करणं.

• महिला-बालकांचे आरोग्य संवर्धन करुन देशाच्या सामाजिक प्रगतीला हातभार लावणं, महिलांना सक्षम करुन कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणं.


प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ठळक वैशिष्ट्ये/अनुदान:

• गॅस जोडणीसाठी १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी रु. १६००/- व ५ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी रु. ८००/- अनुदान गॅस वितरक कंपनीस देण्यात येते. 

• अर्जदार त्यांच्या पसंतीच्या गॅस सिलिंडर वितरकाकडे अर्ज करू शकतात. (INDANE GAS, HP GAS, BHARAT GAS etc).  

उज्जवला योजना महाराष्ट्र:

महाराष्ट्रात एप्रिल, २०१९ पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 (pm ujjwala yojana 2021) अंतर्गत ४०.६३ लक्ष कुटूंबांनी गॅस जोडणीचा लाभ घेतला आहे. मात्र, अद्यापही काही कुटूंबे गॅस जोडणीच्या लाभापासून वंचित आहेत. यातील सर्व पात्र कुटुंबाना शोधुन त्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 मध्ये लाभ देण्याबाबत उज्वला गॅस योजना Ujjwala yojana Maharashtra सुरु करण्यात आली आहे. 

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना निकष/निवड व पात्रता:

SECC 2011 च्या यादी मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व लोकांना पंतप्रधान उज्वला गॅस योजनेचा लाभ घेता येईल. तसेच, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील सर्व SC / ST कुटुंबातील अर्जदार, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, अंत्योदय योजनेत समाविष्ट असलेले, वनवासी, मागासवर्गीय कुटूंबाना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवता येईल.

१) सदरची गॅस जोडणी ही कुटूंबातील कुटूंबप्रमुख प्रौढ स्त्रीच्या नावाने मंजूर करण्यात येईल.

२) अर्जदाराचे वय 18 वर्षे (केवळ महिला) असणे आवश्यक आहे.

३) एक शिधापत्रिकाधारक कुटूंब एकच गॅस जोडणी मिळण्यास पात्र राहील.

४) अर्जदाराच्या नावे या आधी कोणतीही गॅस जोडणी घेतलेली नसावी.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेची कार्यपद्धती:

विभागामार्फत गॅसधारक शिधापत्रिका व बिगर गॅसधारक शिधापत्रिका यांची माहिती तयार करण्यात आली असून ती NIC मार्फत आधारकार्डशी जोडण्यात आलेली आहे. सदर माहिती ही जिल्हाधिकारी यांना दुकाननिहाय पाठविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सदरची माहिती अधिकृत शिधावाटप दुकानदारांना पाठवतील.

तसेच जिल्हास्तरावरील तेल कंपनीचा नियुक्‍त अधिकाऱ्याच्या सहकार्याने गॅस एजन्सी व त्यांना जोडण्यात येणारे शिधावाटप दुकाने यांची यादी तयार करेल. तसेच शिधावाटप दुकानात नवीन गॅसजोडणीचे अर्ज दिले जातील. शिधापत्रिकाधारक अधिकृत शिघावाटप दुकानामध्ये ज्यावेळी केरोसिन घेण्यासाठी येतील त्यावेळी त्यांच्याकडून दुकानदारामार्फत गस जोडणीचा फॉर्म मरुन घेण्यात येईल. किंवा, शिधापत्रिकाधारक केरोसिन घेण्यास न आल्यास शासनाकडून देण्यात आलेल्या यादीच्या आधारे शिधापत्रिकाघारकाकडून गॅस जोडणीचा फार्म मरुन घेण्यात येईल. जी कुटूंबे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ujjwala yojana 2.0 अंतर्गत पात्र ठरतील त्यांना केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत गॅस जोडणी ujjwala yojana free gas cylinder दिली जाईल. उर्वरित शिधापत्रिकाघारक कुटूंबांना राज्याच्या योजनेतुन गॅस जोडण्या देण्यात येतील. 

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना आवश्यक कागदपत्रे:

राज्यात सद्यस्थितीत ५२,००० रास्तभावव दुकाने व २१२२ इतक्या गॅस एजन्सी कार्यरत आहेत. त्यानुसार साधारणत: एका गॅस एजन्सीकडे २५ रास्तभाव दुकानदार नेमण्यात येतील, तसेच लाभार्थ्यांकडून खालील कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेण्यात येतील.

१) विहित नमुन्यातील अर्ज

२) शिधापत्रिका

३) कुटुंबप्रमुख स्री व कुटूंबातील इतर व्यक्तींचे आधारकार्ड

४) लाभार्थ्यांचा (कुटूंबप्रमुख स्त्री) बँकेचा तपशील.

५) आधार कार्ड.

अर्जदाराचे अर्ज व आवश्यक कागदपत्रे जमा करून शिधावाटप दुकानदारमार्फत संबंधित गॅस एजन्सीला दिली जातील व गॅस एजन्सी कागदपत्रांची तपासणी करून शिधापत्रिकाधारक कुटुंबांना तत्काळ गॅस जोडणी मंजूर करतील. याशिवाय, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतो.

Pm ujjwala yojana online apply | पी एम उज्वला योजना ऑनलाईन अर्ज:

पंतप्रधान उज्वला योजनेचा (Ujjwala gas yojana 2021) लाभ घेण्यासाठी ऑफलाईन तसेच, ऑनलाईन Pm ujjwala yojana online apply पद्धतीनेही अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली नमूद नमुना अर्ज व आवश्यक कागदपत्रे यांसह जवळच्या गॅस वितरण एजन्सीकडे जमा करा. याशिवाय, पंतप्रधान उज्वला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो.

टीप: अर्ज कुटुंबातील महिलाच्या नावे करावा तसेच, मोबाईल क्रमांक आधारशी जोडला असावा.

पंतप्रधान उज्वला योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी-

१. सर्वप्रथम https://www.pmuy.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्या.

२. संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर उजव्या बाजूला 'Online Application' हा पर्याय निवडा.

३. त्यानंतर गॅस वितरकाची निवड करायची आहे (Inden Gas, Bharat Gas, HP Gas etc) व 'Click here to Apply' यावर क्लीक करा.

४. यानंतर, 'Ujjwala Beneficiary Connection' हा पर्याय निवडून 'Accept' वर टिक करा.

५. त्यानंतर 'Gas Distributor' ची निवड करायची आहे. (नावाने किंवा लोकेशनद्वारे सर्च करा).

६. यांनंतर, e- KYC चा फॉर्म पहायला मिळेल, त्यामध्ये, 'Agree' , 'Consent' व 'Same Address on Aadhar' या पर्यायांवर टिक करा.

७. आधार कार्ड क्रमांक व कॅप्चा टाकून 'Generate OTP' वर क्लीक करा.

८. 'OTP Verify' केल्यावर, पुढे तुमची Personal Info, Cast, Ration Card, Details, Bank Ac Info इत्यादी तपशील भरा.

९. 'LPG Gas Connection Details' मध्ये आवश्यक असलेल्या वजनाचा सिलिंडर निवडा.

१०. फक्त रेशनकार्डची कॉपी अपलोड केल्यानंतर, रेशनकार्ड वरील सदस्यांची माहिती भरा. 

११. यानंतर 'Accept' वर क्लीक करून ऑनलाईन फॉर्म 'Submit' करा.

अशा प्रकारे, पंतप्रधान उज्वला योजना ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर Application Id क्रमांक मिळेल तो जतन करून ठेवा व आवश्यक कागदपत्रांसह फॉर्ममध्ये निवडलेल्या जवळच्या Distributor कडे भेट द्या.

उज्ज्वला योजना ऑनलाइन लिस्ट:

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेची लाभार्थी सामाजिक आर्थिक आणि जातीय जनगणना 2011 Socio Economic and Caste Census (CECC -२०११) च्या BPL यादी (Ujjwala yojana list ) मध्ये लाभार्थ्यांची नावे पाहता येऊ शकतात. त्यासाठी - सर्वप्रथम, मनरेगाच्या https://mnregaweb2.nic.in/netnrega/dynamic_account_details_ippe.aspx या संकेतस्थळावर भेट द्या व त्यामध्ये राज्य, जिल्हा, ब्लॉक व गाव निवडून प्रधानमंत्री गॅस योजना लाभार्थी यादी यादी पाहू शकता. 

उज्ज्वला योजना फॉर्म PDF:

खालीलप्रमाणे विहित नमुन्यातील फॉर्म, आवश्यक कगत्रपत्रांसह गॅस कनेक्शन वितराकडे जमा करावे लागतात.

• उज्ज्वला योजना KYC फॉर्म PDF: डाऊनलोड करा

• Supplementary KYC document & undertaking फॉर्म PDF: डाऊनलोड करा

• स्वयं घोषणापत्र Self Declaration Form PDF: डाऊनलोड करा

• Pre Installation Chek Annexure II Form PDF : डाऊनलोड करा.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हेल्पलाइन नंबर:

प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी 1800-266-6696 हा हेल्पलाइन क्रमांक आहे. Ujjwala yojana 2.0 helpline number.

• LPG emergency Helpline- 1906

• Tol Free Helpline- 1800-2333-5555.

• Website- https://www.pmuy.gov.in

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

पी एम किसान ट्रॅक्टर योजना २०२१

घरकुल योजना यादी २०२१ महाराष्ट्र

सौर कृषी पंप योजना २०२१

पी एम मुद्रा लोन योजना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या