प्रधानमंत्री वय वंदना योजना मराठी माहिती pradhan mantri vaya vandana yojana marathi


प्रधानमंत्री वय वंदना योजना मराठी माहिती । Pradhan mantri vaya vandana yojana marathi । प्रधानमंत्री वय वंदना योजना 2021 । LIC प्रधानमंत्री वय वंदना योजना । PMVVY scheme details । pmvvy scheme in marathi  । pm vay vandana yojana

Pradhan mantri vaya vandana yojana marathi जेष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात विविध आर्थिक संकटांना सामोरे जावं लागत असतं. वृद्धापकाळातील त्यांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर व आत्मनिर्भर व्हावं त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पीपीएफ योजना, अटल पेन्शन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना यांसारख्या अनके पेंन्शन (निवृत्ती वेतन) किंवा गुंतवणूकीच्या योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविल्या जातात. त्यापैकीच प्रधानमंत्री वय वंदना योजना ही एक केंद्रशासनाची LIC एलआयसी  (भारतीय आयुर्विमा महामंडळ) मार्फत व्यवस्थापन करणारी, देशातील जेष्ठ नागरिकांसाठी आकर्षक व्यजासह परतावा देणारी पेन्शन योजना lic pm pension yojana आहे. ही योजना ४ मे, २०१७ रोजी देशभरात राबविण्यास सुरु झाली.

प्रधानमंत्री वय वंदना योजना मराठी माहिती । Pradhan mantri vaya vandana yojana marathi । प्रधानमंत्री वय वंदना योजना 2021 । LIC प्रधानमंत्री वय वंदना योजना । PMVVY scheme details । pmvvy scheme in marathi  । pm vay vandana yojana

PM Vaya Vandana Yojana 2021 प्रधानमंत्री वय वंदना योजना ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना दहा वर्षांसाठी ८% व्याजदराने परतावा देणारी एकमेव पेन्शन योजना आहे. ज्यामध्ये एकरकमी गुंतवणूक करून मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन घेतले जाऊ शकते.

वय वर्ष ६० किंवा त्याहून जास्त असलेल्या जेष्ठ नागरिकांना दर महिना रुपये १०००/- पेन्शनसाठी कमीत कमी १.६२ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. तर त्रैमासिक पेन्शनसाठी १.६१ लाख, सहा महिन्यांच्या पेन्शनसाठी १.५९ लाख आणि वार्षिक निवृत्तीवेतनासाठी किमान १.५६ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. या योजनेत लाभार्थी जास्ती जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि जास्तीत जास्त मासिक पेन्शन ९,२५०/- रुपये मिळवता येऊ शकते.

प्रधानमंत्री वय वंदना योजना 2021 ठळक वैशिष्ट्ये:

- प्रधानमंत्री वय वंदना योजनेचे व्यवस्थापन LIC India मार्फत केले जाते.

- पेन्शन योजनेचा कालावधी १० वर्षे एवढा आहे.

- सद्यस्थितीत फिक्स्ड डिपॉझिट व पेन्शन योजनांच्या तुलनेत पंतप्रधान वय वंदना योजनेत जेष्ठ नागरीकांना अधिक व्याज मिळत आहे.

- जीएसटी GST/सर्व्हिस टॅक्स Service Tax शंभर टक्के सूट मिळवता येते.

- जास्तीत जास्त १५ लाखाची एकरकमी गुंतवणूक करता येते (पूर्वी ७.५ लाख एवढी होती).

- ६० वर्ष पूर्ण असणारे पती-पत्नी असल्यास दोघेही ३० लाख पर्यंत गुंतवणूक करून रुपये १८,५००/- मासिक पेन्शन मिळवू शकतात.

- पॉलिसी घेतल्यानंतर तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर शिल्लक रकमेच्या ७५% कर्ज सुवीधा मिळवता येते.

- कोणताही गंभीर किंवा असाध्य आजार, रोग किंवा जोडीदाराच्या उपचारांसाठी अकाली पैसे काढण्याची मुभा मिळते.

- १० वर्षाच्या कालावधी पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास वारसदाराला (Nominee) लाभ मिळतो.

- पॉलिसी घेतल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीस प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या नियम व अटी मान्य नसतील तर ऑफलाईन पद्धतीने घेतलेली पॉलिसी १५ दिवसांच्या आत रद्द करता येते.ऑनलाईन पद्धतीने घेतलेली पॉलिसी ३० दिवसांच्या आतमध्ये परत करता येते ज्यामध्ये स्टॅम्प ड्यूटीची रक्कम वजा करून पॉलीसी खरेदी केलेले मूल्य रिफंड केलं जातं.

प्रधानमंत्री वय वंदना योजना 2021 लाभार्थी/पात्रता/निकष:

PMVVY  योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कोणत्याही जास्त सक्तीच्या अटी नाहीत. वय वर्ष ६० व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवता येतो. मात्र तो व्यक्ती देशाचा नागरिक असणं गरजेचं आहे. कुटुंबातील ६० वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक सदस्यांना गुंतवणूक करून स्वतंत्रपणे लाभ मिळवता येतो.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा (pm vay vandana yojana ) लाभार्थीला मिळणारा लाभ एका उदाहरणद्वारे समजून घेऊयात. जयंत यांनी खालील तपशीलने एकरकमी गुंतवणूक करुन पॉलिसी खरेदी केली.


वय – ६० वर्षे

एकरकमी खरेदी किमंत– रु. ७,५०,००० /-

पॉलिसीची मुदत - १० वर्षे

पॉलिसी खरेदी वर्ष - २०१७

पेन्शन घेण्याची पद्धत - मासिक.

वरील तपशीलप्रमाणे, प्रधानमंत्री वयवंदना योजनेत जयंत यांना मिळणारे लाभ खालीलप्रमाणे असतील:

 PMVVY पेन्शन लाभ:

जयंत यांना प्रत्येक महिन्याच्या शेवटी १० वर्षांपर्यंत पेन्शन रु. ५,०००/- मिळत राहितील. व्याज दर ८% असेल. तर ८% प्रमाणे ७,५०,००० ला १२ ने भागून येणारी रक्कम त्याला दरमहा मिळेल. १० वर्षाच्या मुदतीनंतर जर का ते हयात असतील तरच ही रक्कम निश्चितपणे मिळू शकेल.

PMVVY मॅच्युरिटी बेनिफिट:

१० वर्षे पूर्ण झाल्यावर म्हणजेच पॉलिसीची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर जयंत यांना खरेदी किमत मिळेल. म्हणजेच, ७,५०,०००/-  जी त्याने पॉलिसी खरेदी करण्यासाठी दिली होती. 

PMVVY मृत्यू लाभ:

जर का जयंत यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले– वयाच्या ६५ वर्षांपर्यंत त्याला मासिक पेन्शन मिळेल रु. ५०००/- आणि मृत्यू लाभार्थ मूळ खरेदीकिंमत जी आहे रु. ७,५०,०००/- त्याच्या नॉमिनीला मिळेल. हे १० वर्षांच्या पॉलिसी मुदतीच्या काळात कोणत्याही वेळी मृत्यू झाल्यास असेल.

PMVVY सरेंडर मूल्य:

समजा, जयंतचे वय ६८ वर्षे असताना, स्वतःच्या किंवा जोडीदाराच्या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी जयंत यांना पैशांची गरज आहे. अशा परिस्थितीत, ६८ वर्षांपर्यंत त्याला महिन्याचे पेन्शन मिळेल रु. ५,०००/- आणि वयाच्या ६८ व्या वर्षी पॉलिसी परत घेतो तेव्हा त्याला खरेदी किंमतच्या ९८% परत मिळतील. उदा. ७,५०,००० च्या ९८% = रु. ७,३५,०००/-.

प्रधानमंत्री वय वंदना योजना व्याजदर:

प्रधानमंत्री वय वंदना योजनेचे व्याजदर देशाच्या आर्थिक परिस्थितीनुसार किंचित बदलत असतात. मागील काही वर्षात प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या व्याजदरात घट झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे सध्या (ऑगस्ट -२०२१ पर्यंत ) pmvvy interest rate या योजनेचा व्याजदर मासिक पेन्शनचा पर्याय निवडल्यास ८% वरून ७.४० टक्क्यांवर घसरला आहे. तसेच तिमाही, सहामाही आणि वार्षिक पेन्शनचा पर्याय निवडल्यास अनुक्रमे ७.४५, ७.५२, ७.६० टक्के एवढा व्याजदर प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत लाभार्थ्यास प्राप्त होत असतो. पेन्शनची रक्कम निवडलेल्या पर्यायानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होत असते.

प्रधानमंत्री वय वंदना योजना 2021 कागदपत्रे:

प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतगर्त (pradhan mantri pension plan lic ) मार्फत पोलिसी काढण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

• पॅनकार्ड 

• आधार कार्ड

• वयाचा दाखला

• नोकरीवरून निवृत्त झालेल्याचं प्रमाणपत्र/इतर पुरावा

• बँक पासबुक

• फोटो 

प्रधानमंत्री वय वंदना योजना अर्जपद्धती (lic vaya vandana yojana buy online):

प्रधानमंत्री वय वंदना योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थींनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी योजनेचा फॉर्म व आवश्यक कागदपत्रे यांच्यासह जवळच्या कोणत्याही LIC ब्रांच मध्ये भेट द्या. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भारत सरकारच्या LIC of India (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (Plan No. 856, UIN : 512G336V01) संकेतस्थळावर जाऊन खालीलप्रमाणे अर्ज करा. प्रधानमंत्री वय वंदना योज अर्ज करण्यासाठी मुदत ३१ मार्च, २०२३ पर्यंत असणार आहे. LIC of India च्या वेबसाईटवर तुम्हाला थेट ऑनलाईन अर्ज करता येत नाही. मात्र  LEAD GENERATE करून तुम्ही LIC च्या लोकप्रतिनिधींकडून कॉल प्राप्त करू शकता. (lic vaya vandana yojana buy online).

१. प्रधानमंत्री वय वंदना योजना ऑनलाईन अर्ज (lic pmvvy apply online) करण्यासाठी सर्वप्रथम LIC of India च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.  

२. त्यानंतर तुम्हाला 'BUY POLICY ONLINE' चा पर्याय दिसेल, त्यामध्ये 'Click here to buy' हा पर्याय निवडून 'Pension' चा पर्याय निवडा किंवा थेट जाण्यासाठी इथे क्लिक करा. 

३. त्यामध्ये PMVVY (pradhan mantri vay vandana yojana) निवडून तुमची वैयक्तिक माहिती भरा. (नाव, मोबाईल क्रमांक,पत्ता इत्यादी). 

४. CAPTCHA टाकून terms and conditions वर टिक करा.

अशाप्रकारे तुम्हाला LIC OF INDIA च्या प्रतिनिधीकडून कॉल प्राप्त होईल व  पॉलिसी सुरु करण्यास तुम्हाला ते पूर्ण मदत करतील. 

प्रधानमंत्री वय वंदना योजना pdf:

प्रधानमंत्री वय वंदना योजनेबाबतचे महत्वाचे दस्तावेज पीडीएफ (pdf) स्वरूपात पुढीलप्रमाणे:

प्रधानमंत्री वय वंदना योजना PDF: डाउनलोड करा (Download)

प्रधानमंत्री वय वंदना योजना माहिती (English) pdf : डाउनलोड करा (Download)

प्रधानमंत्री वंदना योजना (lic vaya vandana yojana form) ​pdf : डाउनलोड करा (Download).

प्रधानमंत्री वय वंदना योजना टोल फ्री क्रमांक:

PMVVY toll free number प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या (pm vay vandana yojana) अधिक माहितीसाठी 022-6781921 किंवा 022-67819290 या क्रमांकावर कॉल करू शकता. किंवा टोल फ्री क्रमांक 1800-227-717 वर डायल करू शकता. Email - [email protected], Website - https://licindia.in/ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या