महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल ऑनलाईन 2021


ग्रामपंचायत निवडणूक निकाल online


ग्रामपंचायत निवडणूक निकाल ऑनलाईन 2021 How to check online gram panchayat election results 2021 राज्यात ग्रामपंचायत निवडणूक- २०२१ नुकतीच पार पडली. यावेळेस चौदा हजारापेक्षा जास्त ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली आणि अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं होतं. आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती निकालाच्या दिवसाची (१८ जानेवारी, २०२१). तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणते आणि किती सदस्य निवडून आले याची माहिती ऑनलाईन पाहण्याअगोदर पाहु सरपंच पदाची निवड कशी केली जाते?

ग्रामपंचायत मधील सदस्य आणि वॉर्डची संख्या कशी ठरवली जाते?

ज्या क्षेत्राची किंवा भागाची लोकसंख्या एक हजारपेक्षा जास्त आहे. अश्या क्षेत्राला शासनाद्वारे 'गाव' म्हणून घोषित केलं जातं. ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० निर्धारित केलेले आहे. जर का एखाद्या गावक्षेत्राची लोकसंख्या ६०० हुन कमी असेल तर, आजूबाजूच्या गावातील काही क्षेत्रातील संख्या मिळून ग्रामपंचायतीची निर्मिती होते. तिला 'गट ग्रामपंचायत' (Group Gram panchayat) असे म्हणतात. ग्रामपंचायतमध्ये एकूण सदस्य किती असावेत हे त्या गावातील लोकसंख्येच्या आधारे ठरवले जातात. सदस्य म्हणजेच निवडून आलेले उमेदवार. प्रत्येक गावात सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ अशी निर्धारित केलेली असते. गावातील एकूण लोकसंख्येच्या नुसारच निवडणूक अधिकारी गावाचे प्रभाग (वार्ड) तयार करतात. त्यानुसार गावाची विभागणी वेगवेगळ्या प्रभागात  केली जाते. प्रत्येक प्रभागात समान लोकसंख्या असेल, त्याप्रमाणे वार्ड तयार केले जातात.



सरपंचाची निवड कशी होते?

देवेंद्रफडवणीस सत्तेत असताना सरपंच पदाची निवड थेट जनतेतून केली जावी. असा निर्णय घेतला होता. परंतु, सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून निवडून आलेल्या सदस्यांमधून एका उमेदवारची निवड सरपंच म्हणून करण्यात यावी असं जाहीर केलं. सदस्यामधून सरपंच कसा निवडला निवडला जातो ते पाहूया. समजा, माझ्या गावातील लोकसंख्येच्या प्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ११ आहे. एका बाजूला एक पॅनेल, तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गटाचं पॅनेल ठरवलं जातं. ज्यांना सरपंच पद हवे असते ते आपापल्या पॅनेलमध्ये कुणाला घ्यायचं म्हणजेच, कोणत्या वॉर्डात कुणाला उभं करायचं हे ठरवतात. त्यानुसार निवडणूकीसाठी एकूण ११ उमेदवारांची नावं ठरवली जातात. निवडणुकीची पात्रात आणि निकष पूर्ण केल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठीचा अर्ज या उमेदवारद्वारे केला जातो. त्यानंतर निवडणूक अधिकारीद्वारे प्रत्येक उमेदवाराला त्यांची चिन्ह दिली जातात.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, निकालात दोन शक्यता असतात. एकतर ज्या पॅनलचे ११ पैकी ७ उमेदवार निवडून आले म्हणजेच स्पष्ट बहुमत. त्या पॅनेलचा एक उमेदवार विजयी घोषित होऊन सरपंच म्हणून निवडला जातो. पण, समजा जर ११ सदस्यांपैकी एका पॅनेलचे ६ आणि दुसऱ्या पॅनेलचे ५ सदस्य विजयी झाले, तर सरपंच पदासाठी घोडेबाजारीचे प्रकार घडतात. म्हणजेच, दोन्ही पॅनेलमध्ये आपला सरपंच असावा म्हणून एकमेकांत स्पर्धा सुरू होते आणि मग एकमेकांच्या पॅनेलमधील सदस्य फोडण्याचे प्रकार घडतात. घोडेबाजीसारखा प्रकार लोकशाही सारख्या देशात आजही घडून येत हे दुर्दैवच !



महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2021 ऑनलाईन कसा पहावा?

१. ग्रापंचायतचे निवडून आलेले सदस्य पाहण्यासाठी  सर्वप्रथम https://mahasec.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जा.

२. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र निवडणूक आयोगाची वेबसाईट उघडेल. त्यात खालील बाजूस 'Election Results' हा पर्याय दिसेल त्यावर क्लीक करा.


ग्रामपंचायत निवडणूक निकाल

३. यानंतर 'You can see ward wise election result for Local Body General Election on Click Here' असा मेसेज येईल त्यावर परत क्लीक करा.

४. त्यानंतर एक 'Disclaimer' म्हणून सूचना दिसेल. त्यात 'I Agree' इथे टिक करून 'Accept' या पर्यायावर क्लीक करा. 'Disclaimer' म्हणजेच, इथे ऑनलाईन दिलेले निकाल मोजणीच्या दिवशी नामांकन सॉफ्टवेअरमध्ये रिटर्निंग ऑफिसरने दिलेल्या डेटा नुसार दिले आहेत. काही विसंगती आढळून आल्यास संबंधित स्थानिक निवडणूक मंडळास संपर्क करा. असा मेसेज असतो.

५. त्यानंतर 'Local Body Type' मध्ये 'GRAM PANCHAYAT' हा पर्याय निवडा.

६. 'Division' मध्ये तुमचा प्रादेशिक विभाग निवडा. यानंतर, 
District मध्ये तुमचा जिल्हा, 
Taluka: तालुका
Local Body: स्थानिक संस्था
Election Program: निवडणूक कार्यक्रम निवडा. 
त्यानंतर, Ward (वॉर्ड) निवडा. तुमच्या पुढे सदस्यांची यादी तसेच त्यांना मिळालेल्या एकूण मतांची संख्या आणि विश्लेषण पहायला मिळेल. 

मित्रांनो, वरील माहिती आवडल्यास इतरांसोबत शेअर करा आणि माहिती पाहण्यासंबंधित काही अडचण येत असल्यास संपर्क फॉर्म भरुन 'माझा गाव'  ला संपर्क करा किंवा टिप्पणी करून कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या