सिबिल स्कोर म्हणजे काय? Cibil Score Information in Marathi

CIBIL स्कोर म्हणजे काय ? | CIBIL Score - Credit Score Explained in Marathi | Cibil Score Meaning in Marathi | Cibil Meaning in Marathi | Cibil Score Information in Marathi | Cibil Score Marathi | Cibil Full form in Marathi (क्रेडीट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) | सिबिल स्कोर म्हणजे काय? | सिबिल स्कोअर माहिती मराठी

वाचकमित्रहो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा लोन (Loan) घ्यावयाचे झाल्यास,

सिबिल स्कोर (CIBIL Score) म्हणजे काय?

सिबिल स्कोर कुठे वापरला जातो?

सिबिल स्कोर कसा काढला जातो?

तुमचा सिबिल स्कोर कुठे पाहू शकता? इत्यादी माहिती असणे खूप गरजेचे असते. बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोअरला खूपच महत्व आहे.

CIBIL स्कोर म्हणजे काय ? | CIBIL Score - Credit Score Explained in Marathi | Cibil Score Meaning in Marathi | Cibil Meaning in Marathi | Cibil Score Information in Marathi | Cibil Score Marathi | Cibil Full form in Marathi (क्रेडीट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) | सिबिल स्कोर म्हणजे काय?

प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कोणत्याही प्रकारचे लोन घेण्याची आवश्यकता पडतेच. जसे की कार लोन (Car Loan), होम लोन (Home Loan), पर्सनल लोन (Personal Loan), बिझनेस लोन (Business Loan) इत्यादी प्रकारचे लोन मिळविण्यासाठी जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेत किंवा कर्ज पुरवणारी कोणत्याही वित्तीय संस्थेत गेलात तर तेथे सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर तपासला जातो आणि या सिबिल स्कोरच्या आधारेच तुमचे लोन मंजूर केले जाते.


सिबिल स्कोर म्हणजे काय? What is CIBIL Score?

सिबिल स्कोरचा फुल फॉर्म आहे (Cibil Full form in Marathi)- The Credit Information Bureau (India) Limited (CIBIL). (सिबिल स्कोरला 'क्रेडिट स्कोर - Credit Score' असेही म्हटले जाते. Transunion Cibil Limited ह्या कंपनीद्वारे एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर तयार केला जातो. या कंपनीला RBI - Reserve Bank of India ने मान्यता दिली आहे. ही कंपनी कोणत्याही काम किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची क्रेडिट हिस्टरी Credit History म्हणजेच, Financial History याची माहिती ठेवीत असते. जसे की, त्या व्यक्तीवर किंवा त्याच्या व्यवसायावर एकूण किती कर्ज आहे? कर्जाचे हफ्ते किती शिल्लक आहेत? घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड झाली आहे का? इत्यादी माहितीच्या आधारे Transunion Cibil Limited ही कंपनी त्या व्यक्तीचे CIBIL Score किंवा Credit Score ठरवीत असते.

Transunion Cibil Limited या कंपनीकडे आजच्या दिवसापर्यंत अंदाजे 60 कोटी वैयक्तिक आणि 3 कोटी व्यवसायाच्या आर्थिक व्यवहाराची माहिती जमा आहे. भारतातील सर्व बँका आणि वित्तीय संस्था त्यांच्या खातेदारांची माहिती Transunion Cibil Limited या कंपनीला देत असतात.

सिबिल स्कोर कसा काढला जातो?

सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्यामध्ये काढला जातो. 300 हा सर्वात कमी तर 900 किंवा 900 च्या आसपास असणारा सिबील स्कोर हा सर्वात चांगला सिबिल स्कोर असल्याचं दर्शवतो. 750 इतका सिबिल स्कोर हा चांगला असल्याचं गणला जातो आणि वैयक्तिक कर्ज (Personal Loan) किंवा क्रेडिट कार्डसाठी पात्र ठरवण्यास आपली मदत करतो. जर आपला सिबिल स्कोअर 750 पेक्षा कमी असेल तर आपणास बँका किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेमधून लोन घेण्यास अडचणी येतात. कमी सिबिल स्कोअर असणाऱ्या व्यक्तीचे कोणत्याही प्रकारचे लोन नामंजूर करतात. सिबिल स्कोअर चांगला असणे याचा अर्थ असा होतो की, तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगला आहे आणि तुम्ही कर्जाची (Loan) परतफेड किंवा क्रेडिट कार्ड (Credit Card) पेमेंट नियमित आणि योग्य वेळेत करीत आहात.


सिबिल स्कोर चांगला कसा ठेवाल?

बँका किंवा वित्तीय संस्थेमधून कर्ज मिळविण्यासाठी प्रेत्येकांनी आपला सिबिल स्कोर 750 किंवा त्याच्यावर राहण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. सिबिल स्कोर हा खालील चार महत्वाच्या गोष्टींच्या आधारे ठरविला जातो.

१. पेमेंट हिस्ट्री - Payment History :  

घेतलेल्या कर्जाच्या रकमेची पूर्ण परतफेड झाली नसेल किँवा लोनचे हफ्ते उशिरा भरले असतील तर सिबिल स्कोर कमी होतो. क्रेडिट कार्ड वापरणे हे ही एक प्रकारचे कर्जचं आहे. क्रेडिट कार्डचे बिल वेळवर न भरल्यास किंवा उशिरा भरल्यास सिबील स्कोर कमी होतो. त्यामुळे कोणत्याही कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे हफ्ते वेळेवर भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोर चांगला राहतो. सिबील स्कोर काढताना पेमेंट हिस्टरीला 30% प्राधान्य दिले जाते.

२. क्रेडिट एक्सपोजर किवा क्रेडिट लिमिट Credit Exposure or Credit Limit :

Credit Exposure किंवा क्रेडिट लिमिट म्हणजे आपण ठराविक मर्यादेपर्यंतची रक्कम कर्ज म्हणून वापरू शकतो. Credit Limit ही आपल्याला क्रेडीट कार्ड, बँकेतून, ट्रेडिंगसाठी वैगरे संस्थेमधून मिळत असते. दिलेली क्रेडिट लिमिट जर तुम्ही पूर्ण वापरत असाल तर Cibil Score घसरतो. नेहमी मिळालेल्या क्रेडिट लिमिटच्या 30% क्रेडीट लिमिट वापरावी. गरज नसताना 30% पेक्षा जास्त क्रेडीट लिमिटचा वापर कधीच करू नये. सिबील स्कोर काढताना पेमेंट हिस्टरीला 25% प्राधान्य दिले जाते.

३. क्रेडिट टाईप Credit Type :

साधरणतः कर्जाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे, Secured Loan ज्यामध्ये कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या सर्व कागदपत्रांची शहानिशा करून कर्ज मंजूर केले जाते ज्यामध्ये होम लोन, कार लोन, Education Loan याप्रकारचे लोन येतात आणि दुसरं म्हणजे Unsecured Loan ज्यामध्ये जास्त कागदपत्रे न तपासता कोणतीही मंजुरी न घेता मिळवलेले लोन ज्यामध्ये Personal Loan, क्रेडिट कार्ड लोन इत्यादी प्रकारचे लोन येतात. Secured Loan घेतल्याने सिबिल स्कोर चांगला राहतो. याउलट, Secured Loan पेक्षा Unsecured Loan ची संख्या जास्त असेल तर सिबिल स्कोर कमी होतो. सिबील स्कोर काढताना क्रेडिट टाईप २५% प्राधान्य दिले जाते.

४. विनाकारण कर्जाच्या चौकशा :

बहुतेक जण प्रत्यक्ष लोन मिळविण्यापेक्षा केवळ लोनबद्दल चौकशी करण्यासाठी किंवा आपलयाला लोन मिळत आहे का हे पाहण्यासाठी विविध बँकांमध्ये चौकशी करीत असतात. यामुळे सुद्धा सिबिल स्कोर कमी होतो. त्यामुळे केवळ गरज असतानाच बँकामध्ये लोन बद्दल चौकशी करणे फादेशीर ठरते. या गोष्टीला सिबील स्कोर काढताना २५% प्राधान्य दिले जाते.

तुमचा सिबिल स्कोर कुठे पाहू शकता?

पूर्वी सिबिल स्कोर पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत होते. परंतु, आता बहुतेक मोबाईल अँप किँवा वेबसाईट सिबिल स्कोर विनामूल्य दाखवतात. गूगलवर कीतीतरी वेबसाईट आहेत जेथून फ्री मध्ये तुमचा सिबिल स्कोर तपासू शकता. (How to Check CIBIL Score) त्यापैकी काही मोजक्या वेबसाईट खालीलप्रमाणे-

https://www.cibil.com/freecibilscore

https://www.creditmantri.com/cibil-score

https://www.paisabazaar.com/cibil-credit-report

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या