अटल भूजल योजना महाराष्ट्र Atal Bhujal Yojana in Marathi

अटल भूजल योजना मराठी । अटल भूजल योजना महाराष्ट्र । atal bhujal yojana in marathi । atal bhujal yojana maharashtra । atal bhujal yojana maharashtra district list । atal bhujal yojana information । atal jal yojana । atal bhujal yojana funded by । atal bhujal yojana launch date

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शेतीसाठी भूजल साठा अल्प प्रमाणात उपलब्ध असून, दिवसेंदिवस भूजल पातळी खोल जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा भागातील सिंचन विहिरींची क्षमतादेखील कमी होत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील भूजल पुनर्भरणाची आवश्यकता लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने अटल भूजल योजनेची अंबलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. अटल भूजल योजना ही संपूर्णतः केंद्र पुरस्कृत योजना आहे. (Atal Bhujal Yojana in Marathi).

अटल भूजल योजना मराठी । अटल भूजल योजना महाराष्ट्र । atal bhujal yojana in marathi । atal bhujal yojana maharashtra । atal bhujal yojana maharashtra district list । atal bhujal yojana information । atal jal yojana । atal bhujal yojana funded by । atal bhujal yojana launch date

भूजल साठ्यात वाढ करून कृषी क्षेत्रासाठी पाण्याची मुबलक प्रमाणात उपलबद्धता करणे, भूजलाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ ऑक्टोबर, २०२० रोजी केंद्र शासन पुरस्कृत 'अटल भूजल (अटल जल)' योजना राबविण्यास मान्यता दिली. ही योजना सन २०२०-२१ ते सन २०२४-२५ या पाच वर्षांसाठी महाराष्ट्र राज्यता राबविण्यात येणार आहे. (Atal Bhujal Yojana Launch Date in Maharashtra).

'अटल भूजल योजना' राज्यातील १३ जिल्हांमधील ७३ पाणलोट क्षेत्रातील १३३९ ग्रामपंचायतीमधील १४४३ गावांमध्ये राबवली जात आहे.

अटल भूजल योजनेचे उद्दिष्टे:

१. अतिशोषित, शोषित व अंशतः शोषित पाणलोट क्षेत्रात जलसंधारण, भूजल पुनर्भरण इत्यादी सारख्या पाणी बचतीच्या उपाययोजना करून भूजल साठ्यात वाढ करणे.

२. सध्या राज्यात जलसंधारण सुरू असलेल्या योजना जसे की, मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादींच्या माध्यमातून अटल भूजल योजनेला चालना देणे.

३. भूजलाच्या शाश्वत विकासासाठी राज्य, जिल्हा आणि ग्रामीण पातळीवर सक्षम संस्थापक व्यवस्था निर्माण करणे.

४. सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करून उपलब्ध भूजलाचा वापर मर्यादित करणे.


५. सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे.

६. भूजलासंबंधित माहिती व अहवाल जनसामन्यांकरीता खुले करणे.

७. लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडे तयार करणे.

८. भूजल पुनर्भरण उपाययोजना करणे ( सिमेंट, माती नाला बांध, विहिर पुर्नर्भरण इत्यादी).

९. मातीतील आद्रता टिकवून ठेवणाऱ्या प्रणालीचा वापर करणे.

१०. भूजल पातळीतील घसरण दरामध्ये सुधारणा करणे.


महाराष्ट्रातील या जिल्हात राबवली जाणार आहे 'अटल भूजल योजना':

अटल जल योजनेचे कार्यक्षेत्राची निवड करताना राज्यातील अतिशोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधन्य देण्यात आले आहे. यामध्ये खालील जिल्ह्यातील ठराविक तालुक्यातील पाणलोट क्षेत्रांची (गावांची) निवड करण्यात आली आहे.

जिल्हा/गावांची संख्या:

१. पुणे/ ११८

२. सातारा/ ११४

३. सांगली/ ९३

४. सोलापूर/ ११७

५.  नाशिक/ १२९

६. अहमदनगर/ १०९

७. जळगाव/ ११४

८. जालना/ ५०

९. लातूर/ १३६

१०. उस्मानाबाद/ ५५

११. अमरावती/ २१७

१२. बुलडाणा/ ६८

१३. नागपूर/ १२३

एकूण जिल्हे: १३, एकूण गावे: १४४३

अटल भूजल योजनेअंतर्गत समाविष्ट तालुकानिहाय, गावनिहाय आणि पाणलोट क्षेत्रांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा. (Atal Bhujal Yojana Maharashtra District List).


अटल भूजल योजनेअंतर्गत राज्याकरिता आर्थिक तरतूद:

अटल भूजल योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यास एकूण रु. ९२५.७७ कोटींची तरतूद मंजूर असून गुंतवणूक अर्थसहाय्य अधिकतम रु. १८८.२६ कोटी व प्रोत्साहन अर्थसाहाय्य जास्तीत जास्त रु. ७३७.५१ कोटी केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहेत.

अटल भूजल योजनेकरिता राज्यासाठी प्राप्त होणाऱ्या एकूण निधीपैकी ५० टक्के निधी केंद्र शासनाकडून तर उर्वरित ५० टक्के निधी जागतिक बँकेकडून अनुदान स्वरूपात प्राप्त होणार आहे. (Atal Bhujal Yojana Funded By).अटल भूजल योजनेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे  आर्थिक व्यवहार PFMS (Public Finance Management System) प्रणालीद्वारे करण्यात येतील.

सद्यस्थितीत राज्यातील जल संवर्धनाच्या सुरु असेलल्या योजनांमधून एककेंद्राभिमुखता साधण्यासाठी आणि अटल भूजल योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांच्या अध्यक्षेतेखाली "राज्यस्तरीय शिखर समिती'' गठीत करण्यात आली आहे.

तसेच, जिल्हा पातळीवर प्रकल्प अंमलबजावणी व संनियंत्रण शक्य होण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अटल भूजल योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. (Atal Bhujal Yojana Maharashtra).

अटल भुजल योजना (ATAL JAL) ही शाश्वत भूजल व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यासाठी सुरु करण्यात आलेली केंद्रपुरस्कृत योजना आहे. ही योजना देशातील अनेक राज्यांमध्ये ओळखल्या गेलेल्या पाणी टंचाई असलेल्या भागात भूजल व्यवस्थापन करण्यावर भर देते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या