महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022 Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022 | महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना | महात्मा फुले कर्ज योजना २०२१ | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना । Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana । Mahatma Phule Loan Yojana in Marathi | Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana । महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना | Pik Karj Mafi Yojana Maharashtra 2022 | mjpsky maharashtra gov in | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022 | महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना | महात्मा फुले कर्ज योजना २०२१ | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना । Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana । Mahatma Phule Loan Yojana in Marathi | Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana । महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना | Pik Karj Mafi Yojana Maharashtra 2022|  mjpsky maharashtra gov in

महाराष्ट्र राज्यात एकूण १५३ लाख शेतकरी आहेत. शेतीच्या अधिक उत्पन्नासाठी किंवा शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्यासाठी किंवा शेतीशी निगडित कामांकरिता शेतकऱ्यांना शेती कर्ज घ्यावे लागते. व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून हे शेतकरी कर्ज मिळवत असतात.


नैसर्गिक आपत्ती, किंवा राज्यातील काही भागात अवेळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. परिणामी मागील काही वर्षात शेती निगडित शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे शेतकरी वर्ग कर्जाच्या चक्रात अडकलेला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणजे त्यांना शेती कामाकरिता नव्याने पीक कर्ज मिळविण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेजारी वर्ग अत्यंत आर्थिक आणि मानसिक विवंचनेत दिसून येतो.

शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान आणि आणि आर्थिक कर्जाचा बोजा विचारात घेता महाराष्ट्र शासनाने २०१९ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेची घोषणा केली होती. (Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana).

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या मार्गदर्शक सूचना २७ डिसेंबर, २०१९ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्या आहेत. (शासन निर्णय क्रमांक - कृकमा १२१९/प्र.क.१५७/२-स).

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना २०१९ आणि महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहनपर लाभ योजना या दोन्ही योजना एकच असून, प्रोत्साहनपर लाभ योजनेत  विशिष्ट अटींसहीत अतिरिक्त अनुदान शासनाकडून देण्यात येते.

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना २०१९:

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक १ एप्रिल, २०१५ ते ३१ मार्च, २०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना रु. २ लाख पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येतो.

• शेतकऱ्याचे एक किंवा एका पेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक. ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्यजासहित थकीत असलेली रक्कम कर्जमुक्तीसाठी ग्राह धरण्यात येते. (रु. २ लाखापर्यंत).

• लाभार्थी निकषांमध्ये अल्प किंवा अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात घेतले जात नाही.

• केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येतो. शेतकऱ्यांचा गट किंवा समूह नसावा.

• महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत केवळ राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँका द्वारे घेतलेले कर्ज, कर्जमुक्तीसाठी विचारात घेण्यात येते.

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेमध्ये या शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही.

• योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री, सदस्यांना लाभ मिळवता येत नाही.

• केंद्र आणि राज्य शासनाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी.

• राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एसटी महामंडळ इ.) कर्मचारी.

• शेतीव्यतिरित उत्पन्नातून आयकर भरणारे व्यक्ती.

• माजी सैनिक वगळून निवृत्ती वेतनधारक ज्यांचे निवृत्तीवेतन रुपये २५०००/- पेक्षा जास्त आहे.

• कृषी उत्पन्न बाजार समिती. सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी व पदाधिकारी  यांचे मासिक वेतन रु. २५०००/- पेक्षा जास्त आहे.


महात्मा फुले कर्ज योजना 2022 (प्रोत्साहनपर लाभ योजना):

सन २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा केली. या योजनेला 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना' असे संबोधले जाते. (महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022).

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा सन २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती.  मात्र मार्च, २०२० पासून संपूर्ण देशात उद्भवलेल्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने सदर योजनेची अंबलबजावणी करणे शक्‍य झाले नाही. त्यानंतर, २०२२ मध्ये अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेस दि. २७ जुलै, २०२२ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. (Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana).

शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात आली. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवता येतो.

ज्या शेतकऱ्यांनी,

• सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक ३० जून, २०१८ पर्यंत पुर्णत: परतफेड केलेले असल्यास, 

• सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक ३० जून, २०१९ पर्यंत पुर्णत; परतफेड केलेले असल्यास, 

• सन २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास, 

म्हणजेच, सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णत: परतफेड केली असल्यास अशा शेतकऱयांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९ २० या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुं. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येतो. (Pik Karj Mafi Yojana Maharashtra 2022).

मात्र, सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात घेतलेल्या व त्याची पुर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्‍कम रु. ५० हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्‍कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास येतो.

प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्योनी एक किंवा एका पेक्षा जास्त बैकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. ५० हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्‍कम देण्यात येते.

योजनेची अंमलबजावणी यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने करण्यात येते. (महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023).

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना अधिकृत संकेतस्थळ:

https://mjpsky.maharashtra.gov.in/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या