महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान २०२१


महिला सशक्तिकरण

Mahila Sakshamikaran Yojana in Marathi ग्रामविकासामध्ये महिला सक्षमीकरण हा महत्वाचा विषय आहे. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय असे सर्वांगणी समीक्षकरण करणे गरजेचे आहे. महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार प्राप्त व्हावेत म्हणून शासन नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मदत करत असते. राज्यातील महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या जोमाने विकासकामांत सहभागी व्हाव्यात यासाठी शासन अनेक योजना राबवित असते. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगिण विकास होऊन त्यांचे सशक्तीकरण व्हावे. यासाठी, शासनाच्या विविध योजनांचा संगम घडवून, येणाऱ्या जागतिक महिला दिन (Mahila Din 2021) ८ मार्च २०२१ ते जागतिक पर्यावरण दिन ५ जून २०२१ या कालावधीसाठी राज्यात ग्रामीण पातळीवर महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान (Mahasamrudhi Women Empowerment Campaign) राबविण्यास २३ फेब्रुवारी २०२१ रोजी शासननिर्णय काढून राज्य शासनाने मान्यता दिली आहे. 

  हे देखील वाचा:   दिव्यांगांसाठी कायदा व योजना

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचे मुख्य उद्देश

 राज्यातील ग्रामीण महिलांचे अधिक संघटन होण्यासाठी स्वयं सहाय्यता समूह (SHGs), ग्रामसंघ (Village Organisation) आणि प्रभाग संघ (Cluster Level Federation) च्या माध्यमातून त्यांचे संघटन बळकट करणे.

• महिलांचे आरोग्य, पोषण, स्वच्छता, शिक्षण, जीवनकौशल्य इत्यादी बाबत माहिती तसेच जनजागृती करणे.

• शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांना देऊन, त्यांना त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करणे.

• महिलांच्या आर्थिक, सामजिक इत्यासर्वांगणी विकासास चालना देऊन गावाच्या विकासात सहभागी करून घेणे.

• याकामी शासनाच्या सर्व संबंधित विभागासोबत महिला सक्षमीकरणाची लोकचळवळ उभी करणे. 


महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानात राबवले जाणारे उपक्रम

• स्वयं सहाय्यता गट, ग्रामसंघ व प्रभागसंघाच्या माध्यमातून महिला सक्षम संस्था निर्माण करणे

• महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढवणे.

• महिलांचे उपजीविकेचे स्तोत्र वाढविण्यासाठी उत्पादन व सेवा क्षेत्रात उद्योग निर्मितीसाठी कर्ज व निधी वितरीत करणे.

 महिलांनी केलेल्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी ब्रँडिंग व पॅकजिंगवर काम करणे

 महिलांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी प्रदर्शने, कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादन विक्रीची संधी उपलब्ध करून देणे.

 बेरोजगार युवक- युवतींना रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे.

 शासनाच्या विविध घरकुल योजनेचा महिलांचा लाभ मिळवून देणे.

 महिलांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी अन्न, पोषण, आरोग्य व स्वच्छताबाबत उपक्रम राबवणे.

 सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे व त्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे.

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाची काटेकोरपणे अंमल बजवणीसाठी होण्यासाठी राज्याच्या जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर विविध कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यासाठीचे वेळापत्रक, कार्यक्रम व कार्यशाळेचे अधिकारी शासनाने नेमून दिले आहेत. 

मनरेगा कार्यशाळेचे वेळापत्रक:

जिल्हास्तरीय कार्यशाळा- ९ मार्च २०२१

तालुकास्तरीय- १० मार्च २०२१

गावस्तर- ११ मार्च २०२१

  हे देखील वाचा:   ग्रामपंचायत कर आकारणी नियम

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचे ठळक मुद्दे

-  येत्या ८ मार्च रोजी राज्यस्तरावर या अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल. त्याचवेळी जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवरही महिला मेळावे, प्रदर्शने आदींचे आयोजन करुन या अभियानाचा प्रारंभ करण्यात येईल.

-  कोरानाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत, काळजी घेत हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आल्या आहेत.

-  महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी शेत दोघांचे (७/१२ वर पती व पत्नीचे नाव लावणे) आणि घर दोघांचे (नमुना नंबर ८ वर पती व पत्नीचे नाव लावणे) या संकल्पनेअंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव लावणे.

-  अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हे, तालुके आदी विविध घटकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.


-  नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या महिला सदस्यांना पंचायतराजविषयक विविध प्रकारची प्रशिक्षणे देण्यात येतील. असे विविध उपक्रम या अभियानांतर्गत राबविण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव करण्यात येणार आहे.

-  महिला लाभार्थ्यांच्या बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांमध्ये गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, तर घरकुल मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमीपूजन करुन बांधकाम सुरु करण्यात येईल. 

-  अस्मिता योजनेंतर्गत सॅनिटरी नॅपकीनची उपलब्धता आणि विक्रीस चालना देण्यात येईल.

-  विविध स्वास्थ्य आणि विमा योजनांमध्ये महिलांची नोंदणी करणे यासाठी कार्यक्रम घेतले जातील. 

-  गावपातळीवर राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या विविध योजनांमध्ये महिलांचा सक्रीय सहभाग वाढविणे आवश्यक आहे. 

-  महिलांमधील तंबाखुमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीर मुक्ती आदीबाबत जनजागृती करणे, महिलांचे उपजिविकेचे स्त्रोत वाढविणे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

-   महिलांचे हिमोग्लोबीन व बीएमआय तपासणी करुन त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करणे.

एकंदरीत, राज्यात ग्रामीणस्तरावर राबविण्यात येणार हे अभियान (महासमृद्धी महिला सक्षमीकरण) आतापर्यंतचे, महिलांच्या सशक्तीकरण (Mahila Sashaktikaran) आणि बळकटीकरणासाठी अत्यंत प्रभावी ठरेल, असे दिसून येत. त्यासाठी या अभियानाची जनजागृती करणेही तितकेच महत्वाचे आहे. ही माहिती आपल्या समाजबांधवांसोबत नक्की शेअर करा.

माहिती संबंधित काही प्रश्न असल्यास खाली टिप्पणी करून कळवा किंवा 'संपर्क फॉर्म' भरुन 'माझा गाव' ला संपर्क करा.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. गावपातळीवर महिलांना रोजगार मिळावा म्हणून मला कापड शिलाई हा व्यवसाय उभारा वयाचा आहे ,यासाठी मला शासन आर्थिक स्वरूपात मदत करू शकेल काय ?

    उत्तर द्याहटवा
  2. ग्राम सभे मध्ये महिलांना देण्यात आलेले अधिकार व कर्तव्य या विषयी माहिती

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.