आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे मराठी माहिती Aadhar Card Pan Card Link Marathi

Aadhar Card Pan Card Link Marathi भारतामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही कागदपत्रे अतिशय महत्त्वाचे समजले जातात. तुम्हाला माहीतच असेल की भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पॅन कार्ड- आधारकार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तुमचे पॅन कार्ड दिलेल्या मुदतीमध्ये आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुमचे पॅन कार्ड पूर्णपणे निष्क्रिय होऊ शकते.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे | आधार कार्ड पॅन कार्ड लिंक तपासा | Aadhar Card Pan Card Link Date | Aadhar Card Pan card charges । Aadhar Card Pan card link online

आयकर विभागाने (CBDT- Central Board of Direct Taxes) 30 जून 2023 पर्यंत Aadhar Card Pan Card Link करण्याची तारीख वाढवली आहे. (Aadhar Card Pan Card Link Last Date) यापूर्वी पॅन धारकांना Aadhar Card Pan Card लिंक साठी अनेक मुदती देण्यात आल्या होत्या. सुरवातीला 31 मार्च, 2022 पर्यंत पॅन कार्ड, आधार कार्ड सोबत लिंक करण्याची मुदत दिली होती. मात्र कोविड - १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही मुदत आणखी तीन महिन्यानं साठी म्हणजेच 30 जून, 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती. आता आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या तारीखमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. (Aadhar Card Pan Card Link Marathi).

ज्या करदात्यांना 1 जुलै, 2017 पर्यंत पॅन वाटप करण्यात आले आहे. त्यांना लिंक करण्यासाठी 23 जून, 2023 पर्यंत सशुल्क Aadhar Card Pan Card Link करण्याची मुदत दिली आहे. लिंक न केल्यास 1 जुलै, 2023 पासून पॅन निष्क्रिय म्हणून चिन्हांकित केले जाईल.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी लागणारे शुल्क:


पूर्वी Aadhar Card Pan Card Link करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नव्हते. मात्र 30 जून, 2022 पर्यंत आधार कार्ड पॅन सोबत जोडण्यासाठी 500 रुपये एवढा दंड आकारण्यात आला. 30 जून नंतर आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांना 1000 रुपये मोजावे लागत आहेत. ही मुदत ही 30 जून, 2023 रोजी पर्यंत आहे. त्यानंतर आधारशी लिंक न करण्यात आलेले पॅनकार्ड आपोआप रद्द होतील. (Aadhar Card Pan card charges).

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यापासून कोणाला सूट आहे?

प्राप्तिकर अधिनियम 1961 नुसार,

- आसाम, मेघालय आणि केंद्र शासित प्रदेशातील, जम्मू आणि काश्मीरमधील रहिवाशी तसेच अनिवासी भारतीयांना पॅनकार्ड - आधार कार्डच्या लिंक करण्यापासून सूट देण्यात आली आहे.

- याशिवाय 80 वर्षे वयावरील व्यक्तींना आधार कार्ड पॅन कार्ड लिंकिंग पासून सूट देण्यात आलेली आहे.

-  एखादी व्यक्ती भारतीय नागरिक नसेल तर तिलाही आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेसाठी सूट देण्यात आली आहे.

(महसूल विभागाचा संदर्भ क्रमांक ३७/२०१७, दिनांक १ मे २०१७).

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नाही केले तर काय होईल?

जर तुमचं पॅन आधारशी लिंक नसेल तर बँकेतील सगळे व्यवहार ठप्प होतील. याशिवाय ऑनलाईन किंवा इतर कोणताही आर्थिक व्यवहार करण्यासाठी तुमचे कार्ड निष्क्रिय होईल. याशिवाय तुम्ही आयकर विवरण पत्र म्हणजे Income tax return भरण्यास सक्षम राहणार नाहीत.

आर्थिक गैरव्यवहारच्या धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी शासनाने आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. खूप सारे लोकं अशी असतात जे स्वतः चे इन्कम लपवित असतात. Aadhar Card Pan Card Link केल्यामुळे अशा गैरव्यवहाराला आळा बसेल आणि टॅक्सही भरला जाईल.

पॅन कार्ड आधार सोबत लिंक झालं आहे काय कसे पहावे? Check Pan - Aadhar Link Status


- पॅन कार्ड आधार सोबत अगोदरच लिंक आहे हे तपासण्यासाठी आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.

- यानंतर, डाव्या बाजूला असणाऱ्या  ‘Link Aadhar’ हा या पर्यायवर क्लीक करा.

-  ‘Link Aadhar’ पर्यायच्या अगदी खाली 'Click here' to view statue वर क्लीक करा.

- त्यानंतर तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक टाकून View Link Aadhar Status वर क्लीक करा.

- तुमचा पॅन आणि आधार लिंक असेल तर कळेल किंवा नसेल लिंक तरीही त्याची माहिती पाहता येईल.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे? Aadhar card pan card link

Aadhar Card Pan Card Link करण्यासाठी तीन पद्धती आहेत. त्यापैकी जी पद्धत तुम्हाला सोयीस्कर वाटेल  त्या पद्धतीने तुम्ही Pan - Aadhar Link करू शकता.

१. आधार कार्ड पॅन कार्ड लिंक एसएमएस (SMS) द्वारे

२. आधार कार्ड पॅन कार्ड लिंक ऑनलाईन Online

३. आधार कार्ड पॅन कार्ड लिंक ऑफलाईन Offline

१. आधार कार्ड पॅन कार्ड लिंक एसएमएस (SMS) द्वारे

तुमच्या मोबाईल फोनद्वारे एक Text मेसेज पाठवून तुम्ही Pan - Aadhar Link करू शकता. त्यासाठी, मेसेज मध्ये जाऊन तुम्हाला टाईप करायचं आहे,  UIDPAN <SPACE> १२ अंकी आधार कार्ड क्रमांक><SPACE><१० अंकी पॅन कार्ड क्रमांक लिहून ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर तो मेसेज  पाठवायचा आहे.

उदाहरण: UIDPAN 111122223333 AAAPR5555N

२. आधार कार्ड पॅन कार्ड लिंक ऑनलाईन

ऑनलाईन पद्धतीने Aadhar Card Pan Card Link करण्यासाठी तुमचं, पॅन कार्ड, आधार कार्ड सोबत ठेवा. (Aadhar Card Pan Card Link Online).

१. आधार पॅन लिंक करण्यासाठी सर्वप्रथम, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या शासनाच्या संकेतस्थळावर जा.

२. त्यानंतर, डाव्या बाजूला ‘Link Aadhar’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

३. यानंतर, तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल. त्यामध्ये, तुमचा पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक व आधार कार्ड वर असलेलं नाव भरा.

४. तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमचं जन्मवर्ष नमूद असेल तर ‘I have only year of birth in Aadhaar card’ या पर्यायाला टिक करा. (पूर्ण जन्मतारीख असेल तर टिक करू नका).

५. त्यानंतर कॅपच्या टाकून,  ‘Link Aadhar’ या पर्यायवर क्लीक करा.

त्यानंतर, एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये, 'तुमचं पॅन कार्ड आधारकार्ड सोबत यशस्वीरित्या लिंक झालं आहे' असा मेसेज येईल.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक पेमेंट संबंधित माहिती:

Aadhar Card Pan Card लिंक करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवरूनच पेमेंट करणे आवश्यक आहे. त्यासाठी,

https://www.incometaxindiaefiling.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन,

- सर्वप्रथम तुमचा पॅन क्रमांक टाका.

- मोबाईलवर ओटीपी मिळवण्यासाठी पॅन आणि मोबाइल नंबरची पुष्टी करा.

- ओटीपी पडताळणीनंतर, तुम्हाला वेगवेगळ्या पेमेंट पर्याय  दाखवणाऱ्या पेजवर रीडायरेक्ट केले जाईल. 

- आयकर पर्याय निवडून 'पुढे जा' वर क्लिक करा.

- 2024-25 आणि पेमेंटचा प्रकार म्हणून AY निवडा - इतर पावत्या (500) म्हणून आणि सुरू ठेवा.

- त्यानंतर, 1000 रक्कम म्हणून पूर्वावलोकन करा.  'इतर' फील्ड अंतर्गत टॅक्स ब्रेकअप आणि पुढील चरणांसह पुढे जा.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक ऑफलाईन पद्धत:

Aadhar Card Pan Card लिंक करण्यासाठी एसएमएस (SMS) द्वारे आणि ऑनलाईन पद्धतीशिवाय ऑफलाईन पद्धतीने सुद्धा पॅन कार्ड लिंक करू शकता. त्यासाठी PAN सर्विस प्रोवाईडर, NSDL किंवा UTIITSL या सेंटर्स मध्ये जाऊन 'Annexure - I' हा फॉर्म भरावा लागेल. फॉर्म  सोबत आधारकार्ड ची कॉपी जोडून व इतर डॉकूमेंट्स देऊन आधार सोबत पॅनकार्ड लिंक करता येऊ शकते. हे सेंटर्स त्यांच्या नियोजित दरानुसार शुल्क आकारणी करतात.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक पेमेंट पडताळणी पद्धत:

यशस्वी पेमेंट केल्यावर करदात्याला चलनाची पावती मिळेल. रक्कम कापली गेली की नाही याची खात्री करण्यासाठी वापरकर्ता बँक खाते विवरण देखील तपासू शकतो.

- करदाता ई-फाईल > ई-पे टॅक्स> पेमेंट हिस्ट्री वर नेव्हिगेट करून चालान पाहू आणि डाउनलोड करू शकतो किंवा ई-फायलिंग होम पेजवरील क्विक लिंक्स अंतर्गत "पेमेंट स्टेटस जाणून घ्या" द्वारे चलन स्थिती तपासता येते. (Aadhar Card Pan Card Link Website).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या