रंगपंचमी शुभेच्छा संदेश | रंगपंचमी निबंध मराठी | रंगपंचमी माहिती मराठी | रंगपंचमी चित्र | रंगपंचमी बॅनर | रंग पंचमी फोटो | रंगपंचमी 2024 | Rang Panchami Wishes In Marathi | Rang Panchami Information In Marathi
रंगपंचमी निबंध मराठी | रंगपंचमी माहिती मराठी
हिंदू कालगणने प्रमाणे वर्षाचा अखेरचा महिना म्हणजे फाल्गुन. या महिन्यात साजरा केला जाणार प्रमुख सण म्हणजेच होळी सण होय. दोन दिवस असणाऱ्या या सणाच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केली जाते. यादिवशी अग्नीहोम करून त्याभोवती प्रदक्षिणा करून प्रार्थना केली जाते. गुलाल, अगरबत्ती, फुले वाहून मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी होळीची पूजा केल्याने सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, घरात सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. Rang Panchami Information In Marathi.
होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी (Rang Panchami) हा सण सार्वत्रिक साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना गुलाल, रंग लावून हा साजरा केला जातो. एकमेकांच्या अंगावर पिचकरीने रंग उडविले जातात. हा सण महाराष्टात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जात असला तरीही, काही ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशीच साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्याची प्रथा सार्वत्रिक रूढ होत चालली आहे.
रंगपंचमीला धुलीवंदन, धूळवड या नावाने देखील संबोधले जाते. हिंदु पौराणिक कथानुसार, द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण आपल्या सवंगडी-बालगोपाळां सोबत हा रंगोउत्सव साजरा करत असे. तीच प्रथा आजही पाळली जात आहे.
खरंच! प्रत्येक रंगाचा एक विशेष अर्थ असतो, शिकवण असते. पांढरा रंग शांततेचा, लाल त्यागाचा, हिरवा समृद्धीचा अश्या या रंगामुळेच आपले जीवन रंगमय होते. जीवनाला अर्थ राहतो. श्रीकृष्णने जी रंगपंचमी गोकूळमध्ये साजरी केली होती तो रंग भक्तीचा होता. ( रंगपंचमी शुभेच्छा संदेश 2024).
अशा या नवरंगाची उधळण करणारा होळी- रंगपंचमी सणाच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास रंगमय हार्दिक शुभेच्छा !
रंगपंचमी शुभेच्छा संदेश | रंगपंचमी चित्र | रंगपंचमी बॅनर | रंग पंचमी फोटो | रंगपंचमी 2022
रंगपंचमी आणि होळीनिमित्त तुमच्या प्रियजनांना रंगपंचमी चित्र / रंगपंचमी बॅनर / रंग पंचमी फोटोच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश द्या आणि होळी व रंगपंचमीचा हा रंगोत्सव साजरा करा.
भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद
अखंड उडू दे मनि रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
सप्त रंगाची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्याचा गोडवा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी दरवर्षी येते
सर्वांना रंगवून जाते
रंग निघुन जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो.
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगात होळीच्या रंगू चला
स्नेहाच्या तळ्यात डूबया चला
रंग सारे मिसळूया चला
रंग रंगाचा विसरूया चला
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
खुलुन येवो तुमच्या जीवनाचा प्रत्येक रंग
होळीच्या रंगानी बहुरू द्या तुमचे अंतरंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगपंचमी सण हा रंगाचा
आगळ्या वेगळ्या ढगांचा
वर्षाव करी आनंदाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
आला रंगांचा सण
मौज मस्ती धुमशान
आज घरा घरात पुरण पोळी रे
आज वर्षाची होळी आली रे
होळीच्या व रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
नारंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी गुलालाचा
पिचकरीत भरुनी सारे रंग
रंगूवूया एकमेकांना होऊन दंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगपंचमी शुभेच्छा चित्र/फोटो/बॅनर
रंगपंचमी आणि होळीचे शुभेच्छा चित्र/फोटो/बॅनर डाऊनलोड करण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी फोटोवर लॉन्ग प्रेस करा.
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.