कोविड लसीकरण नोंदणी Covid Vaccine Registration Marathi


कोविड लसीकरण नोंदणी Covid Vaccine Registration Marathi | कोरोना व्हायरस लस नोंदणी । कोविड 1 9 लस नोंदणी फॉर्म

Registration for Covid Vaccine above 18 in Maharashtra २८ एप्रिल, २०२१ रोजी कोविड-19 विषयक विशेष बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विषयक  सुविधा लोकांपर्यंत जलद गतीने पोहचविण्याचं आवाहन आरोग्य अधिकारी वर्गाला केलं. गेल्या १६ जानेवारीला सुरू झालेल्या कोविड-19 वैक्सीन लसीकरण Covid Vaccine Registration मोहीमेचा तिसरा टप्पा आता १ मे, २०२१ पासून देशपातळीवर सुरू करण्यात येणार आहे.

कोविड लसीकरण नोंदणी Covid Vaccine Registration Marathi | Covid Vaccine Registration Marathi | कोरोना व्हायरस लस नोंदणी | कोविड-19 वैक्सीन रजिस्ट्रेशन मराठी | covid 19 vaccine registration portal | covid-19 vaccine registration | कोविड 1 9 लस नोंदणी फॉर्म | registration for covid vaccine above 18 in maharashtra | maharashtra covid vaccine registration | cowin gov in registration login

कोविड-19 ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया (कोविड-19 वैक्सीन रजिस्ट्रेशन) २८ एप्रिल, २०२१  पासून देशभरात सुरू झाली. लसीकरणासाठी १८ वर्षावरील देशातील पात्र नागरिकांसाठी येत्या १ मे २०२१ पासून सुरू होणार आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षावरील सर्व पात्र नागरिकांना कोविन पोर्टलवर cowin.gov नाव नोंदणी करणं आवश्यक असणार आहे.


कोविड लसीकरण नोंदणीबाबत ठळक मुद्दे:

• केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून लसीच्या ५ कोटी मात्रा दिल्या आहेत.

• सरकारी लसीकरण केंद्रावर पात्र नागरिकांना मोफत लस दिली जाईल.

• आता तिसऱ्या टप्प्यापासून लसीकरणासाठी नागरिकांना ऑनलाईन कोविन पोर्टलवर cowin.gov वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

• थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आयत्यावेळी नोंदणी करून लस घेता येणार नाही.

• सध्या सुरू असलेलं ४५ वरील वयोगटातील नागरिकांचा लसीकरण पुढे चालूच राहणार.

• यापुढे राज्य सरकार, खाजगी रुग्णालय आणि औद्योगिक संस्था यांना लस उत्पादक कंपन्याकडून लस विकत घ्यायला आणि लसीकरण करायला केंद्रसरकारने परवानगी दिली आहे.

कोविड लसीकरण नोंदणी | कोविड-19 वैक्सीन रजिस्ट्रेशन  प्रक्रिया:

• नागरिकांना मोबाईल नंबरच्या आधारेही नाव नोंदणी करता येणार असून, त्यासाठी ऑनलाईन कोविन पोर्टलवर उपलब्ध अर्ज भरून सोबत अधिकृत ओळखपत्र जोडावं लागणार आहे.

• त्यांनतर नागरिकांच्या सोयीच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पत्ता आणि वेळ एस.एम.एस द्वारे कळविण्यात येईल. 

• एस.एम.एस द्वारे प्राप्त झालेला मेसेज संबंधित लसीकरण केंद्रावर दाखवल्यानंतरच लस दिली जाईल.


कोविड लसीकरण नोंदणी कशी करावी?

१. कोविड लसीकरण नोंदणी (कोविड-19 वैक्सीन रजिस्ट्रेशन) करण्यासाठी सर्वप्रथम https://selfregistration.cowin.gov.in/ वर जा. 

२. त्यानंतर, आपला मोबाइल नंबर टाका. व Get OTP वर क्लिक करा.

३. मोबाईलवर ओटीपी (OTP) मिळाल्यानंतर, त्याला एन्टर करा. व त्यानंतर ‘Verify’ वर क्लिक करा.

२. यानंतर ‘Register for Vaccination’ हे नवीन उघडेल त्यात पेजवर फोटो आयडी प्रूफ, नाव, जेंडर आणि जन्मतारीख सोबत सर्व इतर वैयक्तिक माहिती भरा.

३. त्यानतंर तुम्हाला अपॉइंटमेट शेड्यूल करण्याचा पर्याय पाहायला मिळेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ‘Schedule’ बटनवर क्लिक करा.

४. यानंतर तुम्ही तुमचा पिनकोड टाका, सर्च वर क्लिक करा. या पिन कोड सोबत जवळचे कोविड लसीकरण सेंटरची यादी दिसेल.

५. तुमच्या सोयीप्रमाणे सेंटर, तारीख आणि वेळेची निवड करून ‘Confirm’ या बटणवर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या मोबाईलवर कोविड-19 वैक्सीन रजिस्ट्रेशन यशस्वीपणे पार पडल्याच्या मसेजे येईल. त्याप्रमाणे दिलेल्या तारीख व वेळेत कोविड-19 वैक्सीन सेंटर मध्ये लसीकरणासाठी हजर रहा.

Aarogya Setu | आरोग्य सेतू अॅपवरून कोविड-19 वैक्सीन रजिस्ट्रेशन:

१. Aarogya Setu आरोग्य सेतू अॅप डाउनलोड केले नसेल तर गूगल प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घ्या. 

२. अगोदरच डाउनलोड केले असेल तर, होम स्क्रीनवर देण्यात आलेले कोविन बटणवर क्लिक करा.

२. त्यानंतर 'Vaccination Registration' हा पर्याय निवडा. त्यात आपला फोन नंबर टाका. त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाका.

३. त्यानंतर ‘Register for Vaccination’ हे नवीन पेज उघडेल त्यात तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरा. फोटो आयडी प्रूप, नाव, जेंडर, जन्मतारीख इत्यादी सर्व माहिती टाकून ‘Register’ वर क्लिक करा.

४. यानंतर अपॉइंटमेटला शेड्यूल करण्याचा पर्याय मिळेल. या ठिकाणी ‘Schedule’ बटनवर क्लिक करा.

५. त्यानंतर तुमच्या ठिकाणाचा पिन कोड टाका. आणि  'Search' वर क्लिक करा. 

६. त्यानंतर जवळचे उपलब्ध लसीकरण सेंटर दिसतील. त्यात वेळ सिलेक्ट करून 'Confirm' वर क्लिक करा. तुमचे अपॉइंटमेंट बुक होईल.

एकाचवेळी अनेक लोकांनी कोविड लसीकरण नोंदणीसाठी लॉगिन केल्याने अॅप डाऊन झाले होते. किंवा ते काम करत नव्हते. (cowin app crash, arogya setu app not working) त्यामुळे, Aarogya Setu अॅपवरून ओटीपी प्राप्त करण्यास काही अडचण आल्यास तुम्ही उमंग अॅपवरूनही कोविड-19 वैक्सीनसाठी रजिस्ट्रेशन करू शकता.


उमंग अ‍ॅपवरून कोविड-19 वैक्सीन रजिस्ट्रेशन umang vaccine registration:

उमंग अ‍ॅपवरून कोविड-19 वैक्सीन रजिस्ट्रेशन umang vaccine registration साठी उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा. यानंतर त्यावरील आवश्यक वैयक्तिक माहितीसह लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला कोविड लसीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर आपला मोबाईल नंबरच्या ओटीपीद्वारे लॉगिन करू शकता. आपली आवश्यक वैयक्तीक माहिती भरून नोंदणी होईल आणि लसी केंद्र इत्यादींची माहितीसाठी दिली जाईल.

या अ‍ॅपवरून लस मिळाल्यानंतर अॅपद्वारे लस घेतल्याचे  कोविड लसीकरण प्रमाणपत्र देखील डाऊनलोड करू शकता.

कोविड-19 वैक्सीन रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे/डॉक्युमेंट्स:

तुम्हाला वर नमूद केलेल्या कोविड-19 वैक्सीन रजिस्ट्रेशनसाठी खालीलपैकी एक ओळखपत्र documents for covid vaccine registration ऑईनलाईन अपलोड करावे लागेल.

• आधार कार्ड

•  मतदान ओळखपत्र

• ड्रायविंग लायसन्स

• (MGNREGA) जॉब कार्ड

• MPs/MLAs/MLCs कडून देण्यात आलेले ओळखपत्र

• महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्ड

याशिवाय, पासपोर्ट, पेंशन दस्तावेज़, बँक / पोस्ट ऑफिस कडून देण्यात आलेले पासबुक इत्यादी ओळखपत्राचा वापर करू शकता.

देशातील ऑक्सिजनची उपलब्धता वाढली:

२८ एप्रिलला कोविड- १९ च्या झालेल्या विशेष बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातील एकूण ऑक्सिजन व औषध उपलब्धता तसेच, देशात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचा आढावा घेतला. देशातील  ऑक्सिजन निर्मितीची क्षमता गेल्या ऑगस्ट महिन्यात ५ हजार ७०० टन प्रतिदिन एवढी होती. ती आता ८ हजार ९२२ टन प्रतिदिन इतकी झाली आहे. आणि या महिन्या अखेरला ही क्षमता ९ हजार टन २५० टन प्रतिदिन होईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. 

लसीकरण मोहिमेसाठी युरोपियन देशांची मदत:

देशातील वाढत्या संकटाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी आता जगभरातील अनेक देशांकडून वैद्यकीय मदत मिळत आहे. त्याप्रमाणे अनके युरोपातील देशांनी भारताला वैद्यकीय मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये, आयर्लंड ७०० ऑक्सिजन निर्मिती यंत्र, एक ऑक्सिजन जनरेटर आणि ३६५ व्हेंटिलेटर देणार आहे. बेल्जीयम कडून ९ हजार रेमडेसिवीरच्या कुप्या तर रोमोनिया देशाकडून ८० ऑक्सिजन कॉनसट्रीटर मिळणार आहेत.

लसीकरणाची साथ, करू कोरोनावर १००% मात !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या